Governor Ramesh Bais News : हिंदीसाठी राज्यपालांचा आग्रह, कोश्‍यारींची प्रथा बैस यांच्याकडून खंडित..

Maharashtra : इंग्रजीतून होणाऱ्या दीक्षांत समारंभात तत्कालीन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी बंद करत मराठीचा आग्रह धरला होता.
Governor Ramesh Bais News : हिंदीसाठी राज्यपालांचा आग्रह, कोश्‍यारींची प्रथा बैस यांच्याकडून खंडित..

Marathwada : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हिंदीत व्हावा, यासाठी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आग्रह केला आणि सगळ्याच प्रमुखांची भाषणे हिंदीत झाली. (Governor Ramesh Bais News) यामुळे गेल्या तीन दीक्षांत समारंभात मराठीचा आग्रह धरत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी सुरु केलेली प्रथा अल्पावधितच खंडीत झाली. नव्या राज्यपालांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर, काहींनी नाराजीचा सूर आळवला.

Governor Ramesh Bais News : हिंदीसाठी राज्यपालांचा आग्रह, कोश्‍यारींची प्रथा बैस यांच्याकडून खंडित..
Sunil Kendrekar Voluntary retirement News : स्वेच्छा निवृत्तीनंतर केंद्रेकर शेती, आध्यात्म अन् समाजसेवेला वाहून घेणार..

विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडला. ऐनवेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस (Maharashtra) हे समारंभात ऑनलाईन सहभागी झाले. ते अध्यक्षस्थानी होते तर, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून एआययुच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल उपस्थित होत्या. (Governor) डॉ. मित्तल यांनी भाषणाच्या सुरवातीलाच `राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी सांगितले होते कि, दीक्षांत समारंभ हिंदीतून झाला पाहिजे. त्यानुसार मीही हिंदीतून बोलत आहे. वास्तविक विद्यापीठाचे दीक्षांत समारंभ हे इंग्रजीतूनच होत असतात`, असेही सांगितले.

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनीही त्यांच्या येथील कुलगुरु पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच हिंदीमधून भाषण केले. इंग्रजीतून होणाऱ्या दीक्षांत समारंभात तत्कालीन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी बंद करत मराठीचा आग्रह धरला होता. (Aurangabad) ११ फेब्रुवारी २०२० मध्ये विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्षात भगतसिंह कोश्‍यारी यांनी अशाप्रकारची भूमिका घेतली होती. त्यानुसार कुलगुरु यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनाही मराठीतून बोलण्याचा आग्रह ते धरत होते. सुरवातीचे भाषण त्यांनी मराठीत केल्यावर श्रोत्यांनी स्वागत केले होते.

`दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठात जातो तेव्हा सगळे इंग्रजीत बोलतात तेव्हा मी त्यांना रोखतो. मराठी येत नाही का? असे विचारतो`. असा किस्सा सांगताना त्यांनी इथून पुढचे दीक्षांत समारंभ मराठीतून करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर पुढचे दोन्ही दीक्षांत समारंभ मराठीतून झाले. `ज्या देशाने मातृभाषेत शिकवले त्या देशाने प्रगती केली. चीनमध्ये तीस वर्षात आली त्यापूर्वीची प्रगती चायनीज भाषेतच केली. त्याची लिपी समजणेही अवघड आहे. तसेच तमीळ, तेलगू आहे. आपल्या मातृभाषेत कोणी बोलले तर, बरे वाटते`. अशी पुष्टीही कोश्‍यारी यांनी जोडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com