Government Medical College : घाटीचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्या मागे शुक्लकाष्ठ! शिंदेसेनेच्या आमदाराकडून कारभाराचे पोस्टमार्टम

Government Medical College Dean Dr. Shivaji Sukre faces serious allegations as MLA Pradeep Jaiswal submits a written complaint to the Chief Minister. : अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे चांगले संबंध, संपर्क आहेत. त्यामुळे वर्षभराचा त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला.
Government Medical College Dean News
Government Medical College Dean NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनच शिक्षण पूर्ण केलेले आणि त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक पदापासून थेट अधिष्ठाता झालेले डाॅ. शिवाजी सुक्रे सध्या अडचणीत आले आहेत. विद्यार्थीदशेपासून घाटीतच वावरलेल्या सुक्रे यांना येथील विद्यार्थी, निवासी डाॅक्टर, रुग्ण आणि सगळ्याच विषयांची सखोल माहिती आहे. प्रशासनावर पकड असलेले आणि 'शिवाजी द बाॅस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिष्ठाता सुक्रे यांच्यामागे आता शुक्लकाष्ठ लागले आहे.

अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार प्रदीप जैस्वाल (Pradip Jaiswal) यांनी सुक्रे यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्याचे पोस्टमार्टम करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. घाटी रुग्णालयाला लागणारी यंत्रसामुग्री व इतर कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुक्रे यांच्यावर करण्यात आला आहे. या मागे अभ्यागत समिती सदस्यांना कंत्राट न दिल्याचा राग आणि त्यातून भ्रष्टाचाराचे आरोप केले गेल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे चांगले संबंध, संपर्क आहेत. त्यामुळे वर्षभराचा त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला. (Chhatrapati Sambhajinagar) परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्याने घाटीच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. अभ्यागत समितीचे अध्यक्ष असलेल्या आमदार प्रदीप जैस्वाल यांनीच अधिष्ठातांच्या कारभारावर आक्षेप घेत थेट त्यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Government Medical College Dean News
MLA Pardip Jaiswal News : प्रदीप जैस्वालांची राजकारणातली छत्तीस वर्षे ; ना खंत, ना नाराजी, ना कोणती अपेक्षा!

यामुळे घाटी प्रशासन चांगलेच टेन्शनमध्ये आले आहे. अधिष्ठाता सुक्रे यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढण्यापेक्षा मंत्र्यांनी आपल्या कामाचे कसे कौतुक केले, नियमित आणि चांगल्या कामाबद्दल कशी शाबासकी दिली हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मिडियावर या सदंर्भात सुक्रे यांनी केलेल्या पोस्ट व्हायरल झाल्या आणि या वादाला नवे वळण मिळाले.

Government Medical College Dean News
Imtiaz Jaleel-Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री महोदय, तुमच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्यांक मंत्रालय कुठे आहे?

आपला बचाव करण्यासाठी सुक्रे यांनी पालकमंत्री, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना मी चांगली व नियमानुसार कामे करत असल्याची शिफारस केल्याचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नुकताच संभाजीनगरच्या शासकीय कर्करोग रुग्णालयात लोकार्पण सोहळा पार पडला.

Government Medical College Dean News
Medical Education Department Tender Scam: 90 कोटींच्या वादग्रस्त टेंडरच्या फाइलला पाय फुटले; टेंडरसाठी हट्ट करणारा मंत्री कोण

यावेळीही मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आमच्या कामाबद्दल पूर्ण कल्पना दिलेली आहे, असा दावा सुक्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. यानंतर मात्र हा वाद अधिक चिघळल्याने उपअधिष्ठाता डॉ. काशीनाथ गर्कळ यांच्या मध्यस्थीने हा सोशल 'वॉर'थांबला. चांगली व नियमानुसार कामे केली जात असताना, सुक्रे यांना अचानक मंत्र्यांच्या शिफारशींची गरज का पडली? अशी चर्चा या निमित्ताने घाटी आणि वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com