Grampanchayat Election : `भारत जोडो` नंतरही काॅंग्रेसची पिछेहाट ; राष्ट्रवादीची मुसंडी..

Nanded : अशोक चव्हाण यांनी यात्रेनिमित्त जिल्ह्यात आपली ताकद दाखवून दिली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत ती दिसली नाही.
Nanded District Grampanchayat Election News
Nanded District Grampanchayat Election NewsSarkarnama

Nanded News: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. प्रत्येक पक्ष दावे-प्रतिदावे करत असले तरी स्थानिक गावचे सरपंच, निवडून आलेले सदस्य काय भूमिका घेतात यावरच हे आकडे खरे किती खोटे किती हे ठरणार आहे. (Congress) असे असले तरी नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा विचार केला तर त्यांच्यावर भाजप भारी ठरल्याचे चित्र आहे.

Nanded District Grampanchayat Election News
Grampanchayat Election : राणापाटलांमुळे भाजपची ताकद वाढली, शिवसेनेत वाटेकरी वाढल्याने नुकसान..

जिल्ह्याचे राजकारण काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याभोवती फिरते. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक असल्यामुळे सहाजिकच ग्रामपंचायतीच्या निकालानंतर याच्या यशापयशाची तलुना होऊ लागली आहे. (Ashok Chavan) एका पक्षाचा विचार केला तर भाजप सर्वाधिक ५१ ग्रामपंचायती जिंकत एक नंबरचा पक्ष ठरतो आहे. (Marathwada) अर्थात दाव्यानूसार चिखलीकरांनी तर ९१ ग्रामंपचायती जिंकल्याचा दावा केला आहे. तर काॅंग्रेस २७ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर दिसते.

काॅंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगले यश मिळवले असे म्हणावे लागेल. कारण दोन्ही पक्षांमधील जिंकलेल्या ग्रामपंचायतीमधील अंतर फारसे नाही. राष्ट्रवादीने २६ ग्रामपंचायती जिंकल्याचे सांगितले जाते. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात जसा शिवसेनेला शिंदे गटाचा फटका बसला तसा तो नांदेड जिल्ह्यात देखील बसला आहे. ठाकरे गटाला ८ तर शिंदे गटाला ५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काॅंग्रेस अशीच थेट लढत अनेक ठिकाणी पहायला मिळाली.

महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचा विचार केला तर मग ते भाजपच्या पुढे जातात. नांदेड जिल्ह्यात एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे, ती म्हणजे ४३ ग्रामंपचायतींमध्ये निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व सध्या तरी कायम राखले आहे. त्यांनी आपल्या कपाळी कुठल्याच राजकीय पक्षाचा शिक्का बसू दिलेला नाही. वंचित आघाडीने ९ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवत आपली जिल्ह्यातील ताकद दाखवून दिली आहे. एकंदरित कधीकाळी एकहाती काॅंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवली असे म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा जिल्ह्यात येवून गेली होती. सभा, पदयात्रा आणि काॅर्नर सभांमुळे फक्त नांदेडच नाही तर आजुबाजुच्या जिल्ह्यातील वातावरण देखील काॅंग्रेसमय झाले होते. पण या यात्रेचा फारसा फायदा काॅंग्रेसला होतांना दिसला नाही. अर्थात भारत जोडो यात्रेचा उद्देश वेगळा असला तरी नाही म्हणायला काॅंग्रेसला त्याचा राजकीय फायदा होणे अपेक्षित होते.

Nanded District Grampanchayat Election News
Sanjay Raut : संजय राऊतांवर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, राऊत म्हणजे...

अशोक चव्हाण यांनी या यात्रेनिमित्त जिल्ह्यात आपली ताकद दाखवून दिली होती. पण ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र ती दिसली नाही. याउलट भाजप, राष्ट्रवादीने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र आहे. भाजपचे खासदार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा-कंधार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली.

तिथे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांना धक्का बसल्याच दिसून आले.नांदेड तालुक्यातील सिध्दनाथपुरी येथे आम आदमी पार्टीचा उमेदवार सपवाजी तारू सरपंच पदी विजयी झाला. तिथे त्यांनी कांग्रेसला धोबीपछाड दिल्याचे स्पष्ट झाले. एकंदरित काॅंग्रेसला धक्का, राष्ट्रवादीला बुस्टर देणारे हे निकाल आहेत असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com