Sanjay Raut : संजय राऊतांवर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, राऊत म्हणजे...

Santosh Bangar : ... तर संजय राऊतांच्या कानशिलात लगावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde group MLA's criticism of Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे शिंदे गटावर सडकून टीका करत असतात. महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावरुन देखील राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रोज कानशिलात लगावतात आणि आमचे मुख्यमंत्री गोल चोळत विधानसभेत जातात अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली होती. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा म्हटलं आहे. ( Eknath Shinde group MLA's criticism on Sanjay Raut )

हिंगोलीचे आमदार व शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्यांशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. बांगर म्हणाले, संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा आहे. राऊत जर आमच्या नेत्याविषयी अशा भाषेत विधान करत असेल तर त्यांच्या कानशिलात लगावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच ते ज्या ठिकाणी भेटेल तिथे त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही.

Sanjay Raut Latest News
Girish Mahajan : अजितदादांकडून प्रश्नांचा भडिमार ; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बसवराज बोम्मईंना एका खोलीत बंद करावे त्यानंतरच सीमावादाचा प्रश्न सुटेल अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना बांगर म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांना काही कामं उरली नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत.

Sanjay Raut Latest News
Akola : शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग फसला; वंचित जोरात, अन् 'इंजिन'ही झाले स्टार्ट !

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

खासदार संजय राऊतांनी सीमावादावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेची झोड उठवली होती. राऊत म्हणाले, एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची गेल्या ७० वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. सीमाप्रश्न जरी जुना असला, तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता.

दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी बोम्मईंची भाषा अशी आहे. दोन्हीकडे भाजपाचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सोडलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com