Nanded : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. काही ठिकाणी मतमोजणी करताना राडा झाला आहे. नांदेडच्या मानूर गावातील गुत्ती तांडा या ठिकाणी दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याने राडा झाला. सध्या येथील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाखाली आहे.
विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील काकडदरा येथे मतदान केंद्राच्या बाहेर धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे ही घटना घडली. तळेगांव येथील काकडदरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर दोन गटांत धक्काबुकी झाली. मतदान केंद्रावर झालेल्या राड्याची पोलिसांनी दखल घेतली.
विदर्भापाठोपाठच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मांडळ या ठिकाणी दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराच्या चिठ्ठीवर उमेदवाराचे चिन्ह असल्याने दुसऱ्या गटातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने दोन गट समोरासमोर आले होते.
कोल्हापुरातील राधानगरी चांदेकरवाडीत लोकनियुक्त सरपंच सीमा हिंदुराव खोत या विजयी झाल्या आहेत. कोल्हापुरात बारडवाडीत लोकनियुक्त सरपंच वसंत पांडुरंग बारड विजयी झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतचा सरपंचपदाचा निकाल हाती आला आहे. काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.
जिल्ह्यातील दोन निकाल हाती, एकावर काँग्रेसने, तर एकावर शरद पवार गटाचा विजय मिळवला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण ग्रामपंचायत सरपंच पदासाठी भाजपचे आमदार पाचपुते गटाच्या गुंजाळ जयश्री विश्वास 2206 विजयी, वाघमारे सुनीता दादाभाऊ अकराशे 1129 मते मिळाली आहेत.
पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षांनंतर सत्तांतर झाले असून, या ठिकाणी अभिजित पाटील गटाचे दीपक शिंदे विजयी झाले आहेत. खेडमध्ये 25 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध राष्ट्रवादी (अजित पवार) - 3 शिवसेना (शिंदे गट) - 1 राष्ट्रवादी ( शरद पवार ) - 1भाजपा -1
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.