Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election NewsSarkarnama

Gram Panchayat Election: गावाचा 'कारभारी' आज ठरणार; गुलाल कोण उधळणार...मविआ की महायुती?

Maharashtra Politics : काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण पाहायला मिळालं
Published on

Pune : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. राज्यभरात अंदाजे ७४ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. (Gram Panchayat Elections Result 2023)

महायुतीत अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. सायंकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.

अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूण 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी २९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एकमेकांना शह देण्यासाठी काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे आज येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

Gram Panchayat Election News
Grampanchayat Elections 2023 : मेडदमध्ये मतदानात तुंबळ हाणामारी; पिस्तूलचा वापर? एकमेकांविरुद्ध तक्रारी

पुणे जिल्ह्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी, तर ३१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. यामध्ये पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८०.५२ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ७९.६८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक ८६.१८ टक्के मतदान मावळ तालुक्यात, तर सर्वांत कमी म्हणजेच ७३.९६ टक्के मतदान जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झाले आहे. पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक, तर १४२ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या २३१ पैकी दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित २२९ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यापैकी ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरित १८६ ग्रामपंचायतींसाठी आज मंतदान घेण्यात आले. पोटनिवडणुकीच्या १४२ ग्रामपंचायतींपैकी १११ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये 178 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. एकूण 194 ग्रामपंचायतींमधून जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत हे बिनविरोध झाल्यामुळे 178 ग्रामपंचायतींसाठी 3995 सदस्य उमेदवार, तर 610 सरपंच उमेदवार रिंगणात होते आणि त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया सकाळी नऊ वाजतापासून सुरू होणार आहे.

Gram Panchayat Election News
Satej Patil: सतेज पाटलांचा तिसरा मित्र कोण? यापूर्वी दोन मित्रांचे सोयीचे राजकारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com