Omraje Nimbalkar : पालकमंत्री सरनाईक ध्वजारोहणापूर्वी खासदार ओमराजे, कैलास पाटलांची का पाहत होते वाट? नेमके कारण आले समोर

Dharashiv shivsena News : विवारी सकाळी ध्वजारोहणावेळी मैदानावर पोचल्यानंतर सरनाईक काही काळ खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांची वाट पाहत थांबले होते. त्याचे नेमके कारण समोर आल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranikSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शनिवारीच पालकमंत्री प्रताप सरनाईक प्रथमच धाराशिवमध्ये आले होते. त्यांनी शनिवारी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने बैठकीत पालकमंत्री म्हणून मोठे निर्णय घेतले. त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी देण्याची घोषणा केली. त्यातच रविवारी सकाळी ध्वजारोहणावेळी मैदानावर पोचल्यानंतर सरनाईक काही काळ खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांची वाट पाहत थांबले होते. त्याचे नेमके कारण समोर आल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ध्वजारोहणासाठी मैदानावर पोंचल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना या कार्यक्रमासाठी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), आमदार कैलास पाटील अजून आले नाहीत का? अशी विचारणा केली. त्यानंतर या दोघांची काही काळ वाट पाहत ते थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील उपस्थित होते. यावेळी सभामंडपात बसलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांना सोबत घेऊन व्यासपिठावर ते गेले. हे दोघेजण येईपर्यंत पाच मिनीटे सरनाईक हे दोघांची वाट पाहत होते.

Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Uddhav Thackeray : 'स्थानिक' साठी ठाकरे गटाची स्वबळाची तयारी; काँग्रेससह मित्रपक्षांचा सावध पवित्रा

ओमराजे निंबाळकर, आमदार पाटील आल्यानंतर त्यांना सोबत घेऊनच त्यांनी ध्वजारोहन केले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यांनतर पत्रकार परीषदेत यावर भाष्य करताना पालकमंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी येत्या काळात धाराशिव जिल्ह्याचा कारभार पाहत असताना सत्ताधारी व विरोधकांना सोबत घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वाट पाहत थांबण्याचे नेमके कारण समोर आले आहे.

Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Omraje Nimbalkar: फडणवीसांची ठाकरेंच्या शिलेदाराला एकदा नव्हे तर दोनदा मंत्रिपदाची ऑफर, पण...; ओमराजेंचा खळबळजनक दावा

दरम्यान, काही जणांनी या भेटीचा वेगळा अर्थ काढत येत्या काळात ठाकरे गटाचे खासदार, आमदार महायुतीसोबत जातील, असा आशावाद व्यक्त केला होता. अशास्वरूपाच्या वृताचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी खंडन केले आहे.

Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
NCP News : राष्ट्रवादीपुढे असणार नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष बनवण्याचं लक्ष्य ?

माझ्या भूमिकेबद्दल कोणीच काही शंका घेण्याचे कारण नाही. आम्ही ज्याठिकाणी आहोत त्याठिकाणी खंबीरपणे खुट्टा रोवून उभे आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला पात्र राहून एकनिष्ठपणे काम करीत राहणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले तर दुसरीकडे आमदार कैलास पाटील म्हणाले, 2022 साली मी गुवाहाटीला जात असताना अर्ध्या वाटेतून जीवावर उधार होऊन परत आलो आहे. त्यावेळी मी त्यांच्यासोबत गेलो नाही तर आता जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करीत दुसऱ्या पक्षात कधीच जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Dharashiv Politics Controversy : प्रताप सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; तानाजी सावंतांच्या जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com