Dharashiv Politics Controversy : प्रताप सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; तानाजी सावंतांच्या जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Health Department Decision news : निवडणुकीकनंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना यावेळेस मंत्रिपद मिळालेले नाही.
Pratap Sarnaik, tanaji sawant
Pratap Sarnaik, tanaji sawant Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना गेल्या सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती. मात्र, निवडणुकीकनंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना यावेळेस मंत्रिपद मिळालेले नाही, त्यामुळे ते पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळावा पार पडला त्याला व धाराशिव येथील डीपीडीसी बैठकीला त्यांनी दांडी मारली. त्यातच या डीपीडीसी बैठकीत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आरोग्य विभागाशी संबंधित मोठा निर्णय घेतल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

Pratap Sarnaik, tanaji sawant
Tanaji Sawant News : नाराज तानाजी सावंतांना पालकमंत्री सरनाईकांनी सुनावले खडे बोल; म्हणाले, 'राजकीय खुर्ची नेहमीच...'

धाराशिव जिल्हयाची ओळख माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा जिल्हा म्हणून आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा होताच ते पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्यात आले आहेत. रविवारी त्यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Pratap Sarnaik, tanaji sawant
Dharashiv News : धाराशिवमध्ये पाऊल टाकताच पालकमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा; स्वागताला तानाजी सावंतांची दांडी

सरनाईक यांनी पहिल्याच डीपीडीसी बैठकीत तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्याने या निर्णयाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pratap Sarnaik, tanaji sawant
BJP News : भाजपची मोठी खेळी; शिंदे, अजितदादांना धक्का ? पालकमंत्री नसलेल्या 16 जिल्ह्यांची 'या' नेत्यांकडे जबाबदारी

दरम्यान, यावेळी शिवसेना ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येऊ शकतात, असे संकेत देखील सरनाईक यांनी दिले आहेत. पुढे पुढे बघा, काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले. त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यावर ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. येथील एक खासदार व दोन आमदार ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pratap Sarnaik, tanaji sawant
NCP News : राष्ट्रवादीपुढे असणार नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष बनवण्याचं लक्ष्य ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com