Marathwada Water Issue : लातूरकरांना नळावाटे येणाऱ्या पिवळ्या पाण्याची गंभीर दखल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला तातडीने या पाण्या संदर्भात अहवाल पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. लातूरात गेल्या दोन महिन्यांपासून नळाद्वारे येणाऱ्या पिवळ्या पाण्याबाबत 'सकाळ'ने आवाज उठवला होता. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यांची गंभीर दखल घेत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नळाद्वारे येणाऱ्या पिवळ्या पाण्यामुळे (Latur) लातूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री भोसले हे सातत्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेत आहेत. लातूरात नळाद्वारे येणाऱ्या पिवळ्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यातच कधी काळे तर कधी गढूळ पाणी नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दोन महिने उलटत चालले तरी महापालिकेला पिवळ्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. याबाबत पालकमंत्र्यांनी कानउघडणी केल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. काल बुधवारी (ता. 23) दिवसभरात चारवेळा पालकमंत्री भोसले (Shivendrasinh Raje Bhosle) यांनी दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अगदी उशीरा रात्री म्हणजे बारा वाजता फोन करून माहिती घेतली.
आज पुन्हा सकाळी पालकमंत्र्यांनी फोन करून दिवसभर पिवळ्या पाण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल रात्री उशिरा सादर करा, असे निर्देश दिल्याची माहिती आहे. पालकमंत्र्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील चकरा अचनाक वाढल्या आहेत. गरज पडल्यास या क्षेत्रामधील मुंबईतील तज्ज्ञाला लातूरमध्ये आणण्याचा निर्णयही पालकमंत्री घेणार असून यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, पालकमंत्री भोसले हे तीन दिवस लातूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. बुधवार 30 एप्रिलला येऊन शुक्रवारी 2 मे रोजी ते परत जाणार आहेत. या दौऱ्यात लातूरच्या पिवळ्या पाण्याचा आणि नागरिकांना आठवड्यातून एकदाच मिळणाऱ्या पाण्याचा विषय चर्चेला येणार आहे. महापालिका आणि जलशुद्धीकरण केंद्राला ते भेटही देण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.