
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.
त्यांनी पुढची भेट अंतरवलीतच होईल असे स्पष्ट केले.
सदावर्तेंनी जरांगे यांच्यावर मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला.
Gunratna Sadavrte In Jalna : मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांची फसवणूक केली आहे. ते ढोंगी आहेत, जरांगे आता लवकरच तुमचं गाठोडं बांधले जाणार आहे, असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात दिला. मराठा बांधव मागास नाहीत त्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये एन्ट्री मिळणार नाही, याचा पुनरुचार करत आता आपली पुढची भेट अंतरवाली सराटीमध्येच होईल, असे आव्हानही सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले.
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आज जालना दौऱ्यावर आले होते. दरम्यान, शहरात दाखल होताच त्यांच्या कारवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या लोकांना अडवत सदावर्ते यांच्या गाडीला मार्ग करून दिला. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण आणि जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी दीपक बोऱ्हाडे यांनी अंबड चौफुली येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची भेट घेण्यासाठी सदावर्ते आले होते. या व्यासपीठावरून भाषण करत त्यांनी धनगर समाज एसटीच आहे, हे ठामपणे सांगितले. त्यासाठी सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा दाखलाही दिला. आंदोलन स्थळी भाषण केल्यानंतर सदावर्ते यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. आपल्या गाडीवर झालेल्या हल्ल्या संदर्भात बोलताना, ज्यांना संविधान माहीत नाही असे लोकच भ्याड हल्ले करतात.
पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या दलालांच्या मुसक्या आवळल्या आहेत असे, म्हणत त्यांनी माझ्या धनगर बांधवांसाठी आरक्षण घ्यायला मी इथे आलो आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, लवकरच त्यांचे गाठोडे बांधले जाणार आहे, अशी टीका केली लोकं मुलीला माहेरी नांदायला पाठवतात मात्र जरांगे पाटील यांनी एक नवी परंपरा सुरू केली आहे. जरांगे स्वतः नांदायला सासुरवाडीला आले आहेत, असा टोलाही सदावर्ते यांनी लगावला.
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीत झालेल्या दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका आमदाराचा हात असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात राजेश टोपे यांनी खरं काय ते सांगावं, जरांगे पाटील यांना काय काय मदत केली? हिंसक गोष्टी त्यांना माहीत होत्या की नव्हत्या? याचा खुलासा करण्याचे आवाहनही सदावर्ते यांनी केले. भुजबळ यांच्या वाक्याशी व मताशी मी सहमत आहे, ते जे बोलले ते सत्य आहे, असा दावाही सदावर्ते यांनी केला.
प्र.1. गुणरत्न सदावर्तेंनी कोणाला आव्हान दिले?
मनोज जरांगे पाटील यांना.
प्र.2. पुढील भेट कुठे होणार असल्याचे त्यांनी सांगितले?
अंतरवली येथे.
प्र.3. सदावर्तेंनी जरांगे यांच्यावर कोणता आरोप केला?
मराठा समाजाला फसवल्याचा आरोप केला.
प्र.4. या वादाचा संबंध कोणत्या मुद्द्याशी आहे?
मराठा आरक्षण चळवळीशी.
प्र.5. या आव्हानामुळे काय होऊ शकते?
मराठा आंदोलनात नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.