Shivsena : भुमरेंची सटकली, म्हणाले खैरेंचे डोके गोमूत्राने स्वच्छ करा..

खैरे यांना आता काही काम राहिलेले नाही त्यामुळे कुठे गोमित्र शिंपडायला सांगणे, कुठे काही करणे असे त्यांचे प्रकार सुरू आहेत. (Minister Sandipan Bhumre)
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जाहीर नागरी सत्कार आणि सभेला देखील मोठी गर्दी झाली होती. मात्र (Shivsena) शिवसेनेने ही गर्दी पैसे देऊन जमवल्याचा आरोप केला होता. तर बिडकीनहून एकनाथ शिंदे (Aurangabad) पैठणला रवाना झाल्यानंतर तेथील शिवसैनिकांनी हा मार्ग गोमूत्र शिंपडून शुद्ध केला होता.

यावरून भुमरे यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच चिडले. गोमित्र शिंपडून मार्गाचे शुद्धीकरण करण्यास खैरे (Chandrakant Khaire) यांनीच सांगितले होते, असा आरोप करत खैरे यांचेच डोके गोमित्र शिंपडून धुण्याची वेळ आली आहे, असा घणाघात भुमरे यांनी केला. पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि भुमरे यांच्या खडाजंगी सुरू आहे.

आधी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप आणि त्यानंतर मुख्यमंत्री ज्या मार्गावरून गेले त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केल्यामुळे भुमरे चांगलेच खवळले. शिवाय प्रसार माध्यमांकडून देखील त्यांना यासंदर्भात वारंवार प्रश्न विचारले जाऊ लागले, त्यामुळे त्याचा सगळा राग भुमरे यांनी काल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर काढला.

गोमूत्र शिंपडून मार्ग शुद्ध करण्याचे निरोप खैरेंनीच दिले होते, असा आरोप भुमरे यांनी केला. भुमरे म्हणाले, पैठणच्या सभेला जमलेली गर्दी पाहून खैरे आणि अंबादास दानवे यांचे डोके फिरले आहे. यातूनच ते अशा प्रकारचे आरोप आणि कृती करत आहेत.

Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News
मराठवाडा मुक्तिसंग्राम इतिहासातील देदीप्यमान पर्व, नव्या पिढीला माहिती देणे काळाची गरज..

खैरे यांना आता काही काम राहिलेले नाही त्यामुळे कुठे गोमित्र शिंपडायला सांगणे, कुठे काही करणे असे त्यांचे प्रकार सुरू आहेत. आपण हिंदू धर्मामध्ये गोमित्र कधी शिंपडतो हे एकदा खैरेंना विचारा. खरंतर खैरेंचे डोकेच गोमित्र शिंपडून स्वच्छ करण्याची वेळ आता आली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com