विरोधक नको म्हणून त्यांनी वडिलांना संपवले, पण दुसरा पवनराजे म्हणून मी उभा ठाकलो...

ग्रामपंचायत सदस्यापासून ते कॅबिनेट मंत्रीपर्यंत, दुसऱ्या- तिसऱ्या कोणाची सत्ता नव्हती, त्यांचीच सत्ता होती. दहशतीमुळे प्रचारासाठी कुणी सोबत यायला देखील तयार नव्हते. (Omprakash Rajenimbalkar)
Let.Pawanraje-Mp Omprakash Rajenimbalkar
Let.Pawanraje-Mp Omprakash RajenimbalkarSarkarnama
Published on
Updated on

बीड : कितीही संकटं आली तर डगमगू नका, मागे हटू नका, विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची असेल तर पुन्हा मुसंडी मारा, असे आवाहन करतांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी आपले वडिल पवनराजे निंबाळकर यांची हत्या का झाली? आणि आपण राजकारणात कसे आलो? याची आठवण सांगितली. (Shivsena)

आपल्याला राजकारणात कुणी विरोधकच राहू नये या नीच प्रवृत्तीतून माझ्या वडिलांची हत्या झाली. (Marathwada) राजकारणाचा र माहित नसतांना मी या क्षेत्रात उडी घेतली, जिद्दीन लढलो, त्यांनी एक पवनराजेला संपवले पण मी त्यांच्या पुढे दुसरा पवनराजे होऊन उभा ठाकलो, अशा शब्दांत ओमराजे यांनी आपल्या जुन्या कटु आठवणींना उजाळा दिला.

शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना ओमराजे यांनी कार्यकर्त्यांच्या अंगात उर्जा भरणारे भाषण केले. कधी काळी बीडमध्ये शिवसेनेचा आमदार असायचा पण आता जिल्ह्यात पक्ष कुमकुवत झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी आपण संकटावर मात करून विरोधकांच्या विरोधात कसे उभे राहिलो, त्यांना आव्हान दिले आणि सत्ता हस्तगत केली याचा प्रवास उलगडून सांगितला.

वडिल पवनराजे निंबाळकर यांची हत्या आणि त्यानंतर आपण नेटाने, जिद्दीने कसे लढलो हे ओमराजे यांनी उपस्थितांना सांगितले. ओमराजे म्हणाले, शून्य असं काही आहे हा समजच डोक्यातून काढून टाकायला हवा. न्यूनगंड बाजूला सारून जिद्दीने लढा दिला तर यश निश्चित मिळतेच, याचा अनुभव मी घेतला आहे. ३ जून २००६ रोजी माझे वडिल पवनराजे यांची हत्या करण्यात आली.

केवळ राजकारणात आपल्या विरोधात कुणी उभेच राहू नये या नीच प्रवृत्तीतून ती करण्यात आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत माझे वडिल पवनराजे अपक्ष म्हणून लढले. पण त्यांना फक्त ४८४ मतांनी पराभव झाला. मतदानाच्या काही दिवस आधी पवनराजेंचा आम्हाला पाठिंबा अशा बातम्या विरोधकांनी छापून आणल्या होत्या. त्यामुळे ते अपक्ष लढले, पण त्यांच्या थोडक्यात पराभव झाला. यांच्या मागं कुणी नाही एकदा हा माणूस संपवला की आपल्याला राजकारणात कोणीही विरोधकच उरणार नाही, या प्रवृत्तीतून माझ्या वडिलांची हत्या केले गेली.

वडिलांच्या हत्येने मी खचून गेलो होतो, पण त्याच दिवशी ठरवले आणि राजकारणातला र माहित नसतांना जिद्दीने उभा राहिलो. मला लोकांना दाखवून द्यायचं होतं, `तू एक पवनराजे जरी गोळ्या घालून संपवला असेल, तरी दुसरा पवनराजे तितक्याच ताकतीचा तुझ्या पुढे उभा करेल`. नातेवाईक, पाहुणे मंडळींनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, कशाला नादी लागता, वडिलांचे काय झाले हे पाहिले ना? अशी भिती देखील मनात घातली.

Let.Pawanraje-Mp Omprakash Rajenimbalkar
Shrirang Barne : राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेची कामं होत नाहीत...

पण माघार घेतली तर भविष्यात पवनराजेंच्या पोटी जन्म घेतला, हे सांगायची सुद्धा लाज वाटेल याची जाणीव मला होती. त्यामुळे निर्णयावर ठाम होतो, आता माघार नाही हे ठरवून टाकले. आता जे काय काही होईल ते होऊ द्या, आता सर्वस्व संपलंय या भावनेतून मी राजकारणात उतरलो. ग्रामपंचायत सदस्यापासून ते कॅबिनेट मंत्रीपर्यंत, दुसऱ्या- तिसऱ्या कोणाची सत्ता नव्हती, त्यांचीच सत्ता होती. दहशतीमुळे प्रचारासाठी कुणी सोबत यायला देखील तयार नव्हते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला माझ्या घरातील दोन माणस आणि दुसरा एक असे तिघेच प्रचार करत होतो.

पण अशा परिस्थितीतही आम्ही मागे हटलो नाही. लोक सांगायचे हे तुम्हाला शक्य नाही, पण न डगमगता लढलो आणि त्याच ठिकाणी अडीच हजार मतांनी आमचे दोन्ही उमेदवार लोकांनी निवडून दिले. पहिल्याच झटक्यात लोकांनी जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला काढून दिली आणि पुढे आम्ही अनेक विजय मिळवत गेलो. सगळं काही शक्य आहे, विरोधक कितीही मोठा असू द्या, तुम्ही ठाम राहा, जिद्दीने लढा यश तुम्हाला मिळतेच असेही ओमराजे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com