Collector : सरकारी नोकरीत सामावून घ्या, म्हणत त्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली धमकी..

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रुजू झाल्यानंतर पुन्हा साबळेने आपल्याला नियुक्ती मिळावी यासाठी भेटणे, निवेदन देणे, मेसेज पाठवून आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरू केले होते. ( Aurangabad)
Collector Sunil Chavan
Collector Sunil ChavanSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : अंशकालीन कर्मचारी म्हणून तहसील कार्यालयात काम केल्याची खोटी कागदपत्रे तयार करून त्या आधारे आपल्याला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करत एका तरुणाने थेट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांना आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Marathwada) या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने एका महिला अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे सदर तरुणाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aurangabad)

गेल्या अनेक वर्षापासून हा तरूण आपल्याला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी मागणी करत धमक्या देत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनूसार रामनगर येथील रहिवाशी असलेल्या प्रशांत साबळे या आरोपीने आपण पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याने आपल्याला लिपीक पदी नेमणूक द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे निवदेनाद्वारे केली होती.

त्यानंतर व्हाॅटस्अॅप मॅसेज करत आपल्याला नियुक्ती मिळाली नाही तर आपण आत्महत्या करू अशी धमकी देखील दिली होती. या प्रकरणी तक्रारीनंतर साबळे यांच्यावर सिटीचौक पौलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०१३ ते २०२० दरम्यान, साबळे याने आपल्याला कोतवालपदी नियुक्ती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले होते.

यावर तत्तकालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून तो नोकरीस पात्र नसल्याचे स्पष्टपणे कळवले होते. तरी देखील साबळे हा तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून नियुक्तीसाठी धमकावत होता, आत्महत्या करण्याची धमकी देत होता. २०१८ मध्ये तत्कालीन तहसिलदारांनी देखील साबळे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.

Collector Sunil Chavan
भाजपला धक्का : माजी मंत्र्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रुजू झाल्यानंतर पुन्हा साबळेने आपल्याला नियुक्ती मिळावी यासाठी भेटणे, निवेदन देणे, मेसेज पाठवून आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरू केले होते. चव्हाण यांनी देखील या संदर्भात अहवाल मागवून माहिती मागितली तेव्हा साबळे याने अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही साबळे वारंवार धमकावत होता अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com