Chhatrapati Sambhajinagar : शहरात निघालेल्या हिंदू जन गर्जना मोर्चानंतर मोर्चेकऱ्यांनी राडा घातला. मोर्चा संपल्यानंतर घरी जाताना औरंगपुरा ते निराला बाजार मार्गावर जिथे औरंगाबाद दिसेल तिथे दगडफेक केली. महापालिका शौचालयावरील (Aurangabad) औरंगाबाद नावावर चिखल फासला तर, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील कोनशीलेवर खासदार इम्तियाज जलील यांच्या नावावर शाई फासण्यात आली.
या घटनेनंतर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त वाढवला आहे. (Police) छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात आणि गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा मागण्यांसाठी रविवारी (ता. १९) सकाळी क्रांती चौक ते अदालत रोड मार्गे औरंगपुरा असा `हिंदू जन गर्जना मोर्चा`, काढण्यात आला. (Imtiaz Jalil) मोर्चाच्या शेवटी हैद्राबाद येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी आक्रमक भाषण केले.
याठिकाणी मोर्चाला हजारो तरुण आले होते. भाषण सुरु असतानाच शिवसेना भवनावरून काही तरुणांनी दगडफेक केली. भाषण संपल्यानंतर हे तरुण घरी जाताना जिथे औरंगाबाद नावाचे फलक दिसतील, त्याठिकाणी नासधूस केली. औरंगपुरा येथील सभेच्या ठिकाणाहून ५० मीटर अंतरावरील महापालिकेच्या सुलभ शौचालयावरील औरंगाबाद नावावर मोर्चेकऱ्यांनी चिखल फासला.
त्यानंतर सरस्वती भूवन महाविद्यालयाच्या बस थांब्यावरील औरंगाबाद बोर्ड फोडून टाकले. त्यापुढील बस थांब्यावरील बसचे वेळापत्रक ज्यावर औरंगाबाद असा उल्लोख होता ते काढून चिखलात टाकण्यात आले. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या ॲक्सिस बँकेच्या शाखेवर औरंगाबाद नाव दिसल्याने त्याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. दगडफेकीतील दोघांना पोलिसांनी धरुन ठेवले होते.
तत्पुर्वी क्रांती चौकात वर्षभरापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. चौथऱ्या शेजारी असलेल्या कोनशीलेवर खासदार इम्तियाज जलील यांचे नाव होते. मोर्चाच्या दरम्यान, काही उपस्थितांनी जलील यांच्या नावावर पेनातील शाई फासत नाव पुसण्याचा प्रयत्न केला. मोर्चा संपल्यानंतर क्रांती चौकात पोलिसांची कुमक वाढवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.