Hindu Jan Jagran March News : दंगा करायला नाही, हिंदूंना जागरूक करायला आलोय..

Rajasingh Thakur : इम्तियाज जलील हिंदू विभागाला गेला म्हणून निवडून आला. पण आता इम्तियाज याने पुन्हा निवडणूक जिंकून दाखवावी.
Mla T Rajasingh Thakur News
Mla T Rajasingh Thakur NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : हिंदू जनगर्जना मोर्चात भाजपचे (Bjp) तेंलगणातील वादग्रस्त आमदार राजासिंह ठाकूर हे सभागी झाले होते. आपल्या आक्रमक भाषणासाठी ते ओळखले जातात. मोर्चाच्या समारोप प्रसंगी राजासिंह ठाकूर यांनी आपल्या शैलीत भाषण केले, त्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चाचे ते एक आकर्षण ठरले.

Mla T Rajasingh Thakur News
Imtiaz Jalil News : बाहेरून गुंडांना बोलावून अशांतता निर्माण केल्याबद्दल नेत्यांचे धन्यवाद...

बाहेरून लोक शहरात दंगा करायला येत असल्याचा आरोप एमआयएमने (Aimim) केला होता. याचा संदर्भ देत राजासिंह ठाकूर यांनी `आम्ही दंगे करायला नाही, तर हिंदूना जागरुक करायला आलोय`, असे म्हणत सुनावले. (Aurangabad) सभेत मार्गदर्शन करताना राजासिंह ठाकुर म्हणाले, औरंगाबादच्या नावासाठी उपोषण करणारे आम्ही बाहेरचे लोक असल्याचा आरोप करत आहेत. आम्ही अखंड भारताचे आहोत, हा देश आमचा आहे. बाहेरचे कोण आहे ते तुमच्या पुर्वजांना विचारा.

हिंदूना एकत्रीत करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, दंगा करणे आमचा उद्देश नाही. जेव्हा हिंदुच्या विषयी बोलतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक, त्यांचे अंगरक्षक किती होते हे सांगितले जाते. मात्र हेच लोक जेव्हा छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करतात तेव्हा त्यांना कुणी का विचारत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला. औरंगजेब हा स्वत:च्या बापाचा, भावाचा नाही झाला, त्याचे समर्थन कसे करु शकतो.

या औरंगजेबने आमची मंदिर तोडली, आमच्या प्राचीन संस्कृतीशी निगडीत शहरांची नावे बदलली. अनेकांचे बळजबरीने धर्मांतर केले, तिर्थयात्रेला जाणाऱ्यांना कर लावला. तो औरंगजेब त्यांच्या परिवाराचा नाही, झाला, तो तुमचा कसा होईल? याचा विचारही होणे गरजेचे असल्याचे ठाकुर म्हणाले. आता नुसते औरंगाबादचे नाव बदलले, अजून बरीच नावे बदलायची आहेत. औरंगपुराचे नाव संभाजीपुर, अहमदनगरचे आहिल्याबाईनगर करायचे आहे.

ज्या प्रमाणे प्रतापगढवरील अफजल खानाची अनाधिकृत कबर काढली. त्याचप्रमाणे औरंगजेबच्या कबरचे अस्तितव मिटवावे लागेल. हा काळा इतिहास बदलण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नसल्याचा इशाराही ठाकूर यांनी यावेळी दिला. इम्तियाज जलील हिंदू विभागाला गेला म्हणून निवडून आला. पण आता इम्तियाज याने पुन्हा निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान आम्ही देतो. आगामी काळात तुम्ही कोणाला मतदान करा, पण औरंगजेबच्या विचाराचे लोक कदापी जिंकता कामा नये, असे आवाहन देखील ठाकूर यांनी उपस्थितांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com