Ambadas Danve On Shivgarjana News : हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा, पण इतर धर्माचा द्वेष नाही..

Marathwada : जनतेच्या विकासाच्या व कल्याणकारी योजनांच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर कार्य करा
Ambadas Danve On Shivgarjana News
Ambadas Danve On Shivgarjana NewsSarkarnama

Shivsena (UT) : जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रश्नांवरून नव्हे, तर गोरगरीब व सामान्य नागरिकांच्या विकासाची कामे करून शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. (Ambadas Danve On Shivgarjana News) शिवगर्जना मोहिमे अंतर्गत खुल्ताबाद तालुक्यातील विविध गावात जावून त्यांनी सर्वसामान्य नागरीक तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Ambadas Danve On Shivgarjana News
Mp Imtiaz Jalil On Ram Temple : एक मंदिर वाचवून मी हजारो मशिदी वाचवल्या...

स्थानिक गावकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी पुढाकार घ्या आणि जनतेच्या विकासाच्या व कल्याणकारी योजनांच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर कार्य करा, असे आवाहनही दानवे यांनी केले. (Shivsena) शिवसेना पक्ष व छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाभरात संघटनात्मक कार्याचा आढावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात संवादपर `शिवगर्जना`,आता जिंकेपर्यंत लढायचं या संपर्क मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

आज खुल्ताबाद तालुक्यातील सुल्तानपूर व बाजार सावंगी येथील पदाधिकारी व शेतकऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधला. (Aurangabad) श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, विजेची समस्या, पिक कर्ज, पिक विमा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परंतु (Marathwada) अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची समस्या ओळखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसैनिकाने कार्य करावे.

हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे, परंतु या संघटनेने कधीही कोणत्या धर्माचा द्वेष केलेला नाही. सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुध्दा याच विचारांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्याच विचाराला घेऊन आपल्याला आगामी काळात सामान्य जनतेसाठी कार्य करायचे आहे, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com