Hingoli Lok Sabha Constituency : प्रत्येकवेळी खासदार बदलण्याची परंपरा 34 वर्षांपासून हिंगोलीकरांनी राखली कायम !

Shivsena Nagesh Patil Ashtikar News : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार प्रत्येकवेळी नवा देण्याची परंपरा आहे. या निवडणुकीतही परंपरा हिंगोलीकरांनी जपली आहे.
Uddhav Thackeray, Nagesh patil Ashtikar
Uddhav Thackeray, Nagesh patil Ashtikar Sarakaranma

Hingoli Lok Sabha Result 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार प्रत्येकवेळी नवा देण्याची परंपरा आहे. या निवडणुकीतही परंपरा हिंगोलीकरांनी जपली आहे. येथे खासदार प्रत्येकवेळी नवीनच निवडून येतो. हे समीकरण यावेळेस कायम राहिले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी निवडून आले आहेत.

त्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन खासदार देण्याचे समीकरण हिंगोली मतदारसंघाने जपले आहे. 1991 मध्ये शिवसेनेचे (Shivsena) विलास गुंडेवार हे विजयी झाले होते. 1996 शिवसेनेचे शिवाजी माने, 1998 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील, 1999 शिवसेनेचे शिवाजी माने तर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूर्यकांता पाटील विजयी झाले होते. (Hingoli Lok Sabha Constituency)

2009 च्या लोकसभा मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन मतदारसंघ तर नांदेड जिल्ह्यातील दोन मतदारसंघ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक असा मिळून हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे.

या मतदारसंघातून 2009 मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे तर 2014 च्या मोदी लाटेत कॉंग्रेसचे (Congress) दिवंगत नेते राजीव सातव विजयी झाले होते. तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले.

2024 च्या निवडणुकीत हेमंत पाटलांचे (Hemant Patil) तिकीट कापून ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाने बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली. त्याचा फटका या ठिकाणी शिंदे गटाला बसला. या ठिकाणी ठाकरे गटाची नागेश पाटील-आष्टीकर हे निवडून आले. जवळपास गेली 34 वर्ष प्रत्येक टर्मला या ठिकाणी खासदार बदलण्याची परंपरा कायम आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तीन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर एक ठिकाणी शिंदे गट आणि एक ठिकाणी अजित पवार गट असे सहापैकी 5 आमदार महायुतीचे आहेत, तर कॉंग्रेसचा एकमेव आमदार आहे. त्यासोबतच कळमनुरीत आमदार प्रज्ञा सातव यांच्या रूपाने कॉंग्रेसच्या विधान परिषद आमदार आहेत.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com