Hingoli Mahayuti : भाजपच्या श्याम भारतींकडून महायुतीत मिठाचा खडा? म्हणाले खासदार पाटील...

Loksabha Election 2024 : भाजप आमदार आणि शिवसेना खासदार यांच्या विकासकामांच्या श्रेयावरून वाद
Hemant Patil, Yogi Shyam Bharti Maharaj
Hemant Patil, Yogi Shyam Bharti MaharajSarkarnama
Published on
Updated on

साजीद खान ( माहूर)

Nanded Political News :

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशा महायुतीतील घटक पक्षांमधील कुरबुरीही वाढताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातील नेते लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याचे सांगत 'मिशन 45'ची तयारी करत आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना शिंदे गटात बेबनाव असल्याचे समोर येत आहे.

भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी शाम भारती महाराज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेचे (शिंदे) हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर जनता नाराज असल्याचे ते म्हणालेत. याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि दोघांचेही समर्थक एकमेकांवर तुटून पडले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हेच उमेदवार असतील, असा दावा केला जातोय. 

Hemant Patil, Yogi Shyam Bharti Maharaj
Dharashiv Loksabha 2024 : काका मला खासदार करा, पुतण्याची इच्छा तानाजी सावंत पूर्ण करणार?

बांगरांनी फुले उधळली

हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी तर त्यांची उमेदवारी जाहीर करत त्यांच्यावर फुलेही उधळली होती. असे असताना महायुतीतील भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने जनता खासदार हेमंत पाटील यांच्यावर नाराज असल्याची जाहीर टीका केल्याने पाटील समर्थक संतापले आहेत.

भाजप Vs शिवसेना

हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात आधीच जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या श्रेयावरून स्पर्धा सुरू आहे. त्यातच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पैनगंगा नदीवरील धानोडा आणि इतर ठिकाणच्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या मान्यतेवरून आमदार आणि खासदार यांनी आपणच ही कामे मंजूर करून आणल्याचा दावा माध्यमांकडे स्वतंत्रपणे केला होता. या श्रेयवादातून काही काळ या दोघांमधील संबंध ताणले गेले होते. नेत्यांमध्येच जमत नसेल तर स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती कशी असेल, अशी चर्चा आता सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांना अचानक सहा महिन्यांच्या आतच पदावरून हटवण्यात आले. यावरून भोयर गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीच मने जुळलेली नाहीत, मग महायुतीचा उमेदवार निवडून कसा येणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे. स्थानिक नेत्यांमधील विसंवाद मिटवून त्यांना एकत्र आणण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले नाही, तर मात्र महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो.

(Edited by Avinash Chandane)

Hemant Patil, Yogi Shyam Bharti Maharaj
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री आले, भाषण केलं अन् निघून गेले; इच्छुक उमेदवार गॅसवरच !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com