Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री आले, भाषण केलं अन् निघून गेले; इच्छुक उमेदवार गॅसवरच !

Loksabha Election : महायुतीचा धारशिवमधील उमेदवार कोण असेल, यावर तिन्ही पक्षांकडून मौन का?
Eknath Shinde in Dharashiv
Eknath Shinde in DharashivSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिवमधील संकल्प मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना धाराशिवमधून महायुतीचा उमेदवार कोण असेल? याचे काहीतरी संकेत देतील, अशी अपेक्षा होती.

मात्र संपूर्ण भाषणात ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल बोलले, ना पालकमंत्री सावंत यांनी चकार शब्द काढला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यापूर्वी लोकसभा इच्छुकांनी केलेली बॅनरबाजी वाया गेली, असेच म्हणावे लागेल.

Eknath Shinde in Dharashiv
Dharashiv Loksabha 2024 : काका मला खासदार करा, पुतण्याची इच्छा तानाजी सावंत पूर्ण करणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीतील कोणता पक्ष धाराशिवची जागा लढवणार याबद्दल ब्र ही न काढल्यामुळे इच्छूक गॅसवर आहेत. महाविकास आघाडीने विद्यमान ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली नसली, तरी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी त्यांच्या नावावर एका जाहीर कार्यक्रमात शिक्कामोर्तब केले होते.

शिवसेना फुटल्यानंतर ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) साथ दिल्यामुळे धाराशिवमध्ये दुसऱ्यांदा त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की. दुसरीकडे महायुतीने अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यातून ते लोकसभा उमेदवारीबाबत काहीतरी संकेत देतील, अशी अपेक्षा होती. परंतु महायुतीतील एकही पक्ष कोणत्या मतदारसंघात कोण लढणार? उमेदवार कोण? असणार याबद्दल बोलायला तयार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिवची जागा महायुतीतील शिवसेना लढवणार, असा दावा केला जातोय. माजी खासदार रवींद्र गायकवाड, पालकमंत्री तानाजी सावंत, त्यांचे पुतणे धनंजय सावंत या इच्छूकांची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. यातील काहींचे तर भावी खासदार म्हणून बॅनरही झळकले आहेत. पण या उतावीळ भावी खासदारांना महायुतीच्या नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) हे धाराशिवमधून लढू शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

परंतु लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. असे असले तरी महायुतीकडून कुठल्याच मतदारसंघाबद्दल आणि तिथल्या उमेदवाराबद्दल सध्या काहीच बोलायचे नाही, असे ठरले आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा! हेच शिंदे यांच्या आजच्या संकल्प मेळाव्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेना (Shivsena) का सोडली याचा प्रवास अन् उद्धव ठाकरे यांच्यावर टीका यावरच पाऊण तासाचे भाषण करत मुख्यमंत्र्यांनी धाराशिवकरांचा निरोप घेतला.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde in Dharashiv
Loksabha Election : फडणवीसांच्या दोन शिष्यांमधून विस्तवही जाईना, लातूरमध्ये भाजप 'हॅटट्रिक' करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com