

Marathwada Politics News : हिंगोली विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये निवडून गेलेले आणि जिल्ह्यात भाजपची पायाभरणी करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता, असे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर उर्फ बापू यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील रहिवासी असलेले बळीराम पाटील कोटकर यांचा मनमिळाऊ स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि करारी नेतृत्व यामुळे ते राजकीय क्षेत्रात परिचित होते. बापू नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोटकरांचा जनसंपर्कही दांडगा होता.
1990 मध्ये भाजपकडून हिंगोली विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा काँग्रेसच्या साहेबराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 95 मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांना हिंगोलीच्या मतदारांनी पसंती दिली.
2000 च्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर बळीराम पाटील यांनी अपक्ष उमेदवार दाखल केला, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांचे मन फार काळ या पक्षात रमले नाही आणि ते पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतले.
हिंगोली जिल्हा निर्मितीमध्येही ते अग्रेसर होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.