Shivsena : ये डर जरूरी है.. अंधेरीतील माघारीनंतर उद्धवसेनेने भाजपला डिवचले..

बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं रडायला नाही. समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असू दे. शेवटी पराभव समोर दिसताच मागार घेतली, असो शेवटी काय धकधकत्या "मशाली" समोर मिंधेगट, महाशक्तीची माघार. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : अनेक नाट्यमय घडामोडी, उद्धवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारीच मिळू नये यासाठी निर्माण करण्यात आलेले अडथळे, त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेचे काढलेले वाभाडे आणि राज ठाकरे यांच्या पत्रानंतर (Bjp) भाजपने घेतलेली माघार यामुळे अंधेरी पुर्वची न झालेली निवडणूक चांगलीच गाजली.

भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाली.(Shivsena) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षावर जात मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उमेदवार न देण्याबद्दल पाठवलेले पत्र या सगळ्याचा परिणाम भाजपच्या माघारीत झाला.

ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्षात पडेली फूट, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा पहिला विजय म्हणावा लागेल. या विजयाचे पुढे राजकारणात काय पडसाद उमटतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

परंतु भाजपच्या माघारीनंतर राज्यात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धवसेनेने तर पराभव दिसू लागल्यानेच भाजपने माघार घेतल्याचा दावा केला आहे. या सगळ्या घटनाक्रमावर शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक टीका करणारी पोस्ट व्हायरल केली आहे.

Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Shivsena : निष्ठेची मशाल घेऊन परिवर्तन करूच ; जैस्वालांना उद्धवसेनेचा इशारा..

दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत भाजप आणि शिंदे गटाला डिवचले आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढायला शिकवलं रडायला नाही. समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असू दे. शेवटी पराभव समोर दिसताच मागार घेतली, असो शेवटी काय धकधकत्या "मशाली" समोर मिंधेगट, महाशक्तीची माघार. ये डर जरूरी है! असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com