Marathwada Political News : केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून होणारी जातीनिहाय जनगणनेची मागणी मान्य करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया यायला लागल्या आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात मूळ जनगणनेसोबत आता जातीनिहाय जनगणनाही होणार आहे. ही केवळ आकड्यांची मोजणी नाही, तर सामाजिक न्यायाचा पाया आणि नवीन धोरणांचा मार्गदर्शक दस्तऐवज ठरणार आहे, अशा शब्दात मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन करतानाच दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचीही यावेळी आठवण काढली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) साहेब, यांच्यासह अनेक मान्यवर नेते, संस्था, संघटनांनी ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून केलेली आहे. या मागणीस मान्यता दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा तसेच संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार धनंजय मुंडे यांनी मानले आहेत. या संदर्भात सोशल मिडियावर धनंजय मुंडे यांनी पोस्ट केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी,अशी मागणी केली जात होती. याच मागणीवर केंद्र मोठे पाऊलं उचलले आहे. सरकारने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
गेल्या अनेक दिवासापासून विरोधकांकडून देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसारने हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने याला प्रचाराचा मुद्दा बनवला होता. आम्ही सत्तेत आलो तर देशभारत जातनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.