Dhananjay Munde fashion show : मुंडेसाहेब फॅशन-शो का गेले? मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, 'ते हिरो दिसतात...'

NCP minister Babasaheb Patil Beed MLA Dhananjay Munde fashion show Mumbai political implications : 'एनसीपी'चे बीड आमदार धनंजय मुंडे मध्यंतरी मुंबईतील एका 'फॅशन-शो'च्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde fashion show
Dhananjay Munde fashion showSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : महायुती सरकारमधील मंत्रिपद गेल्यानंतर बीडचे आमदार धनंजय मुंडे शांत आहे. त्यांना आजारपणानं ग्रासलं आहे. मात्र राजकीय गुन्हेगारीमुळं बीड चांगलच गाजतच आहे. यात, टार्गेटवर सर्वाधिक आमदार मुंडे आहेत.

आमदार मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहे. मध्यंतरी अजित पवार बीड दौऱ्यावर असताना, आजारपणाचे कारण देत धनंजय मुंडे यांनी दांडी मारली होती. त्यावेळी मुंडे हे मुंबईतील एका फॅशन-शोमध्ये हजेरी लावल्याचं समोर आलं होतं. हा 'फॅशन-शो'चा मुद्दा अजूनही डोकं वर काढत असून, त्यावर आता त्यांच्या पक्षाचे नेते मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड (BEED) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव मुख्य आरोपी म्हणून आले. यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. उपमुख्यमंत्री पवार 2 एप्रिलला दौऱ्यावर आले असताना, त्यावेळी आमदार धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. आमदार मुंडेंची ही गैरहजेरी खूपच गाजली.

Dhananjay Munde fashion show
Bachchu Kadu On Raj Thackeray : राज ठाकरे ठरवणारे कोण? बच्चू कडू कडाडले, 'आमदार, खासदार अन् अधिकाऱ्यांची पोरं दहा-दहा भाषा...'

यावेळी पवार यांनी मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नसल्याचे सांगितले. तसा मुंडेंनी निरोप दिला होता, असेही सांगितली. पण त्याच दिवशी सायंकाळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुलीच्या 'फॅशन-शो'ला हजेरी लावल्याचे फोटो समोर आले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. आता धनंजय मुंडे यांनी लेक वैष्णवी मुंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खुलासा केला होता.

Dhananjay Munde fashion show
BJP Sujay Vikhe : 'नावं, व्हॉट्सॲप चॅट, कॉल्स, सर्व काही माझ्याकडे'; सुजय विखे गद्दारांशी घेणार पंगा

आमदार मुंडे यांच्या या 'फॅशन-शो'वर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेडमध्ये पुन्हा प्रतिक्रिया दिली. "मुंडेसाहेबांना तुमच्यासारख्या एखाद्याने आग्रह केला असेल, मुंडेसाहेब तुम्ही हिरो दिसता, या 'फॅशन-शो'ला, असा आग्रहामुळे मुंडेसाहेब देखील गेले असतील".

बीडमधील महिला वकिलाला सरपंचाने केलेल्या मारहाणीवर बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बीडमध्ये असं होत असेल, तर समाजाला जागरूक करावं लागेल, असे म्हटले. आमदार धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस कार्यक्रमांना एकत्र येण्याचे टाळतात, एकत्र येण्याचं काय कारण आहे, मुंडे यांची तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरलेसिस झालेला आहे. त्यांना नीट बोलता येत नाही. आमच्या मुंबईच्या मिटींगला धनंजय मुंडे येत असतात. मात्र आपण दुसरचं बघतो, असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com