विकासनिधी मिळवण्यासाठी किती हात जोडावे लागतात, तुम्हाला काय माहित?

(Shivsena Mla Sanjay Shirsath) चागंले रस्ते, सुविधा पुरवण्याचे काम महापालिकेचे नाही तर मग कुणाचे आहे? एवढी मोठी महापालिका जर आमच्याकडे पैसे नाही म्हणत असेल तर मग आमदाराने पैसे कुठून आणायचे.
Mla Sanjay Sirsath
Mla Sanjay SirsathSarkrnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः पैसे कमावणे, कंत्राटदारी करणे यात मला रस नाही. मी दहा वर्ष नगरसेवक, पंधरा वर्षापासून आमदार आहे. एखादा असता तर कुठल्या कुठे गेला असता. एकवेळा नगरसेवक झालेला व्यक्ती दुसऱ्यावेळी आमदारकी लढतो. पण मला पैशाचा सोस नाही, मला तुमचे प्रेम मिळाले, तेच पाहिजे.

माझा मतदारसंघ मोठा आहे, सगळ्यांच्या अपेक्षा पुर्ण करणे शक्य नसले तरी मी पुर्ण प्रयत्न करत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे लागून मी मतदारसंघासाठी निधी आणत आहे. निधी आणण्यासाठी किती हात जोडावे लागतात, मागे लागावे लागते हे तुम्हाला काय माहित? असे सांगत सातारा-देवळाईच्या विकासासाठी मी ५० कोटी रुपये आणल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

मतदारसघांतील विकासकामच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी शहरातील रस्त्यांच्या यादीत पश्चिम मतदारसंघावर झालेल्या अन्यायावर भाष्य केले. संजय सिरसाट म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सातारा-देवळाईच्या विकासासाठी स्वतंत्र बैठका झाल्या, त्यात साडेतीनशे कोटी या भागाला देण्याचा निर्णय झाला. मग तो सगळा निधी या भागाला मिळायला पाहिजे होता, पण मिळाले किती फक्त दोन कोटी.

या भागात मोठे बंगले, घर आहेत, या भागात राहणारे लोक शहारचे नागरिक नाहीत का? ते कर भरत नाहीत का? मग त्यांना चागंले रस्ते, सुविधा पुरवण्याचे काम महापालिकेचे नाही तर मग कुणाचे आहे? एवढी मोठी महापालिका जर आमच्याकडे पैसे नाही म्हणत असेल तर मग आमदाराने पैसे कुठून आणायचे. ३ कोटींच्या विकासनिधीमध्ये ही कामे होऊ शकतात का? असा सवालही संजय सिरसाट यांनी केला.

Mla Sanjay Sirsath
ओवेसींचे इंजेक्शन एमआयएममधील गटबाजी संपवण्यासाठी लागू पडणार?

पण तुमच्यासाठी भांडणे आणि विकासनिधी खेचून आणणे हे माझे कामच आहे. तुम्ही काळजी करू नका, या मतदारसंघात सगळी विकासकामे होतील, टप्प्याटप्प्याने होतील. माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन देखील सिरसाट यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com