औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांवर शिवसेना नेते संजय राऊत हे सातत्याने ५० कोटी रुपये प्रत्येक आमदारांना मिळाल्याचा दावा करत आहेत. यावर बंडखोर आमदार माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राऊत यांनाच उलट सवाल केला आहे. राज्यसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला मतदान केले, तेव्हा तुम्ही आम्हाला किती पैसे दिले हे आईची शपथ घेऊन सांगावे, असे आव्हानच त्यांनी दिले.
राज्यातील सत्तासंघर्ष आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल २३ दिवसांनी अब्दुल सत्तार हे औरंगाबादेत दाखल झाले.यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना उशीरा येण्याचे कारण विचारले तेव्हा मतदारसंघातील दीड-दोन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून आलो. (Sanjay Raut) माझ्या राजकीय आयुष्यात मिळाला नाही एवढा निधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचेही सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यक्रमाला सत्तार यांच्या आग्रहावरूनच ते नगरविकास मंत्री असतांना औरंगाबादेत आले होते. नव्या राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, त्यात तुमची वर्णी लागणार का? या प्रश्नावर सत्तार म्हणाले, मला कुठल्याही राज्य किंवा कॅबिनेट मंत्रीपदाची आशा नाही.
नवे सरकार आहे, त्यात किती मंत्रीपद शिंदे गटाच्या वाट्याला येतात, त्यात काय निर्णय घेतला जातो यावर सगळे अवलंबून आहे. माझ्यासाठी एकनाथ शिंदे हे मु्ख्यमंत्री झाले हीच समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. मंत्रीपद मिळाले नाही तरी कार्यकर्ता हे मोठेपद माझ्याकडे आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.