Maratha Reservation News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, हैदराबाद गॅझेट लागू करा यासह इतर सर्व मागण्या आज राज्य सरकारने मान्य केल्या. मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाचव्या दिवशी यश मिळाले. राज्यभरात विजयाचा गुलाल उधळला जात असताना अंतरवाली सराटीत एका बाजूला जल्लोष तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचावसाठीचे बेमुदत उपोषण हे चित्र पहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा घेतलेला निर्णय हा ओबीसींवर (OBC Reservation) अन्याय करणारा असल्याचा आरोप करत आंदोलकांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. ओबीसी नेते बळीराम खटके यांनी उपोषण स्थळी आज भेट दिली. हैदराबाद गॅझेटियरचा अध्यादेश शासनाने आज काढला हा अध्यादेश ओबीसीवर अन्याय करणारा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसींना फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्यांनी आमची निराशा केली. (Maratha Reservation) फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी जो अध्यादेश काढला तो ओबीसीवर समाजासाठी धोकादायक आहे. यावर आता काय भूमिका घ्यायची हे ओबीसीचे नेते आणि पदाधिकारी यापुढे जो निर्णय घेतील त्यानूसार पुढची भूमिका ठरवली जाईल, असे खटके यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षण बचावसाठीच्या लढ्यात समाज बांधवांनी ताकदीने सहभागी होणे गरजेचे आहे, असेही बळीराम खटके म्हणाले. सोनिया नगर, अंतरवाली सराटी येथे ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी प्रा.विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखणे, बाबासाहेब बटुळे, श्रीहरी निर्मळ, आसाराम डोंगरे यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण कायम आहे. माजी आमदार नारायण मुंडे, सुभाष चाटे, प्रल्हाद शिंदे आदी ओबीसी पदाधिकारी यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री येथील आरोग्य अधिकारी डॉ. विजय दगडे, आरोग्य सहाय्यक ऐ.बी.जरारे, आरोग्य सेवक एस. बी. मगरे यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केली. दरम्यान, मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर गावातील महिलांनी उपोषण स्थळाजवळच्या मंडपात येऊन गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.