`मीच मोठा नेता`, वादात आमदार शिरसाट यांची उडी ; म्हणाले, आम्ही सर्व शिवसैनिक..

खैरे-शिरसाट यांचे राजकीय संबंध चांगले आहेत, या दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचे कधी ऐकिवात नाही. (Mla Sanjay Shirsat)
Sanjay Sirsath-Chandrakant Khaire
Sanjay Sirsath-Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये सध्या `मीच मोठा नेता`, ते माझ्या लेव्हलचे नाहीत, असा वाद चांगलाच रंगला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यातील मोठ्या नेत्याच्या वादापासून जिल्ह्यातील इतर आमदार, लोकप्रतिनिधी अंतर राखून होते. (Shivsena) पण छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या शिवजागर मोहिमेच्या पत्रकार परिषदेत पुन्हा हा विषय समोर आला. (Aurangabad)

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी या वादात आता उडी घेतल्याने नव्याने `मोठा नेता`, विषय समोर आला आहे. पत्रकारांनी खैरे यांनी केलेल्या विधाना संदर्भात शिरसाट यांना विचारले असता शिवसेनेत सगळेच सारखे, एका लेव्हलचे आहेत. कुणी कुणाची लेव्हल ठरवू नये, ती जनताच ठरवत असते असे म्हणत खैरेंना टोला लगावला.

खैरे सध्या मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेले आहेत. इंफाळमध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला संधी देण्याची विनंती देखील केली. एकीकडे शिवसेनेतील वरिष्ठ नेते खैरे यांना मोठा नेता मानत त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देत आहे, तर इकडे मात्र त्यांच्याच जिल्ह्यातील आमदार, मंत्री, जिल्हाप्रमुख त्यांना नेता मानायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे आणि खैरे यांच्यातील वाद शिवसेनेसाठी नवा नाही. पण हा वाद कधीकधी विकोपाला जातो आणि मग `मोठा`, कोण ? याची आठवण करून दिली जाती. खैरे यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत शिवसेनेतील रचना कशी असते हे सविस्तरपणे सांगत पक्षात नेतेपद हे कोणत्याही मंत्री, आमदार, खासदारापेक्षा मोठे असल्याचे सांगत आपली लेव्हल वरची असल्याचा टोला दानवे व त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना लगावला होता.

यावर भुमरे-दानवे यांनी स्वतःच खैरे आमचे नेते असल्याचे सांगत हा विषय अधिक चर्चिला जाणार नाही याची काळजी घेतली. पण शिवजागरच्या पत्रकार परिषदेत पुन्हा हा विषय निघाला आणि आतापर्यंत शांत बसलेल्या शिरसाट यांनी या वादावर तोंड उघडले. संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेत सगळे एकाच लेव्हलचे आहेत, कुणीही मोठा, छोटा नाही. मी मोठा म्हणणे म्हणजे ज्या शिवसैनिकांच्या जीवावर आपण सत्तेची पद, आमदारकी, मंत्रीपद, खासदारकी भूषवली त्या शिवसैनिकांचा अपमान ठरेल.

Sanjay Sirsath-Chandrakant Khaire
राज्यातील छोट्या विमानतळांवरून महिन्याभरात उड्डाणे

शिवाय राजकारणात आपली लेव्हल जनता ठरवत असते, असा टोला लगावला. खैरे-शिरसाट यांचे राजकीय संबंध चांगले आहेत, या दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचे कधी ऐकिवात नाही. मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील आपल काम, मतदारसंघ आणि आपण अशा भूमिकेत कायम राहिले. गटबाजी, अंतर्गत धुसफूस यापासून हे दोघे कायमच लांब राहिले. मतदारसंघातील कामे करून घ्यायची असेल तर थेट संबंधित मंत्र्यांकडे जाऊन निधी, मंजुऱ्या आणणे आणि काम करणे हीच या दोघांची पद्धत कायम राहिले आहे.

त्यामुळे किरकोळ वाद झाले असतील, पण प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा होईल असे कधी घडले नाही. शिरसाट यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे मोठा नेता वादावर भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खैरे-सत्तार यांच्यातील वाढती जवळीक हे तर या मागचे कारण नाही ना? अशी चर्चा देखील या निमित्ताने सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com