Raosaheb Danve News : मी अजून मैदान सोडलेलं नाही! रावसाहेब दानवेंनी खासदार काळेंसमोरच शड्डू ठोकला..

Raosaheb Danve declared, in front of MP Kalyan Kale, that he has not left the political field : आज जाफ्राबाद मतदारसंघात भाजपा नेत्यांच्यासमोर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला खरा. पण तो त्यांच्याच अंगलट आला, असे म्हणावे लागेल.
Raosaheb Danve on Kalyan Kale News
Raosaheb Danve on Kalyan Kale NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : काम मंजूर करून आणतो मी आणि संतोष दानवे, पण बातमी लागते रावसाहेब दानवेंनी मंजूर करून आणल्याची, ही काय भानगड आहे? असा टोला जालन्याचे काँग्रेस खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांना लगावला. यावर हजरजबाबी दानवे यांनी 'मी आता सरपंचही नाही, पण पटापट काम करून आणतो, मग बातमी येणारच ना! मी पटांगण सोडलेलं नाही, पळालो नाही मला लोकसभा मतदारसंघ सांभाळायचा आहे, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी कल्याण काळे यांच्यासमोरच शड्डू ठोकला.

2024 ची लोकसभा निवडणुक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील महायुतीसाठी धक्कादायक निकाल देणारी ठरली. मिशन 45 घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपाचे दिग्गज नेते, तत्कालीन मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या पराभवाने तर भाजपाला धक्काच बसला. काँग्रेसच्या कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव करत जालन्याची जागा जिंकली. लोकसभा निवडणुकीतील वातावरण विधानसभेला मात्र राहिले नाही आणि महाविकास आघाडीचे पानीपत झाले.

आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. जालना मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण पाठवले जात नाही, राजकीय दबावातून मला बोलावले जात नाही, अशी तक्रार खासदार कल्याण काळे यांनी केली होती. (Raosaheb Danve) एवढेच नाहीतर संबंधित विभागाला हक्कभंगाची नोटीस देत दमही भरला होता. त्यानंतर आता काळे यांना विकासकामांच्या उद्घाटन, भूमीपूजन, लोकार्पण सोहळ्याला बोलावले जाऊ लागले.

Raosaheb Danve on Kalyan Kale News
MP Kalyan Kale : खासदार कल्याण काळे म्हणाले, मला रावसाहेब दानवे यांच्याकडून 'एक' गोष्ट शिकावी लागेल!

आज जाफ्राबाद मतदारसंघात भाजपा नेत्यांच्यासमोर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला खरा. पण तो त्यांच्याच अंगलट आला, असे म्हणावे लागेल. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या रावसाहेब दानवे यांनी कल्याण काळे यांच्या विधानाचा आपल्या शैलीत समाचार घेतला. मी आता साधा सरपंचही नाही, पण पटापट काम मंजूर करून आणतो, मग माझ्या बातम्या येणारच ना! मी अजून पळालो नाही, पटांगण सोडलेलं नाही, मला लोकसभा अजून साभाळायंची आहे, असे सांगत पुढच्यावेळी मीच पुन्हा मैदानात असेल, हे स्पष्ट करत काळेंना आव्हान दिले.

Raosaheb Danve on Kalyan Kale News
Raosaheb Danve-Arjun Khotkar : जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत युतीतील दानवे-खोतकरांची प्रतिष्ठा पणाला!

कल्याण काळे, संतोष दानवे तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा लहान आहात, असा टोला लगावत जिल्ह्याच्या राजकारणात मीच दादा असल्याचे रावसाहेब दानवे यांनी दाखवून दिले. जाफ्राबाद-भोकरदन मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना, बसस्थानक आणि ई बस चार्जिंग स्टेशनच्या कामाचे भूमीपूजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित करण्यात आले. या कार्यक्रमात काळे-दानवे एकाच व्यासपीठावर आले होते. दोघांनी आपापल्या भाषणातून एकमेकांना टोले लगावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com