
Pankaja Munde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेसोबत बंड केल्याने राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली. परिणामी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यात आला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले.
यानंतर शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या साथीने आणि भाजपच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतली. यामुळे शिंदे गट, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मोठं शाब्दीक युद्ध सुरू झाल. दरम्यान, भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) य़ांनी भाजप आणि शिवसेना युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली असून युती झाल्यास आपल्याला सर्वाधिक आनंद होईल, असे म्हटले आहे. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Pankaja Munde Latest Marathi News)
पंकजा यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आणि आरक्षणाविना निवडणुका झाल्या तर त्या अन्यायकारक ठरतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
येत्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावर बोलतांना पंकजा म्हणाल्या की, ओबीसी समाजाचे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष होते. जाहीर झालेल्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. मला सरकारकडून अपेक्षा आहेत. ओबीसी प्रश्नावर लढणारी कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही माझी विनंती आहे की, त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन तत्काळ आगामी निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी मुंडे यांनी केली.
पंकजा म्हणाल्या, ओबीसी आरक्षणामुळेच नाही, तर अतिवृष्टी, महापूर, यासारख्या कारणांमुळेही निवडणुकांना स्थगिती देता येईल. मात्र, ओबीसी आरक्षण हेही तितकंच गंभीर कारण आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. नोटिफिकेशन काढल्यावर निवडणुका कशा थांबवायच्या हा न्यायालयाचा प्रश्न उचितच आहे. मात्र, त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी राज्यात सरू असलेल्या राजकीय नाट्यावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना भाजप शिवसेना युतीसंदर्भात प्रश्न विचारला. यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, भाजप आणि शिवसेना युती झाली तर याचा मला सर्वाधिक आंनद होईल,अशी थोडक्यात प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पंकजा मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध असून पंकजा कधीच भाजपच्या इतर नेत्यांसारखी शिवसेनेविरोधात कठोर शब्दात टीका करत नाहीत. तर दुसरीकडे जेव्हा-जेव्हा पंकजा यांना भाजपकडून डावलण्यात आले. त्यावेळी शिवसेकडून 'सामना'तून भाजपवर निशाणा साधण्यात आल्याचे बघायला मिळाले. तसेच पंकजा यांना उद्धव ठाकरे हे आपली बहिण मानतात. यामुळेच 2014 साली भाजप आणि शिवसेना युती तुटल्यावर पंकजा यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात शिवसेकडून उमेदवार उभा करण्यात आला नव्हता. तर वारंवार पक्षाकडून डावलण्यात आल्यावर पंकजा या शिवसेनेत जातील, अशी नेहमीच चर्चा रंगत असते. यावर पंकजा यांच्या या प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.