Nanded Shivsena News : उद्धव ठाकरेंवर जेसीबीने पुष्पवृष्टी करू नका; नांदेड पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवसैनिक संतप्त

Police Refused Permission : पोलिस प्रशासन शिंदेंच्या दबावाला बळी पडत असून आम्ही सर्व शिवसैनिक त्याचा निषेध करत आहोत
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Nanded Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (ता. २७ ऑगस्ट) दुपारी हिंगोलीत जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी ते नांदेड विमानतळावर उतरून मोटारीने हिंगोलीला जाणार होते, त्यामुळे नांदेडच्या शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. मात्र, ठाकरेंवर जेसीबीने पुष्पवृष्टी करू नका; अन्यथा सर्व जेसीबी जप्त करण्यात येतील, असे सांगून पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे शिवसैनिकांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. (JCB don't shower flowers on Uddhav Thackeray; Nanded police refused permission)

शिवसेनेत बंड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रथमच हिंगोलीत येत आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्या सभेसाठी ठाकरे मुंबईहून विमानाने नांदेडला येणार आहेत. नांदेडहून ते हिंगोलीला रर्स्ते मार्गाने जाणार आहेत. उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनंतर नांदेडमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताची शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मोठी तयारी केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास ११ जेसीबी आणले होते. मात्र, जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Uddhav Thackeray
Nitin Desai Case : सनी देओलला एक न्याय अन्‌ आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का?; संजय राऊतांचा सवाल

उद्धव ठाकरे यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करू नका; अन्यथा सर्व ११ जेसीबी जप्त करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला, त्यामुळे या २१ जेसीबींना पुष्पवृष्टी न करताच माघारी परतावे लागले. याबाबत स्थानिक नेत्यांनी सांगितले की, नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी जेसीबीद्वारे आपणास स्वागत करण्यासाठी सक्त मनाई आहे. तुम्ही जेसीबीने स्वागत करण्याचा प्रयत्न केला तर जेसीबी जप्त करण्यात येतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Uddhav Thackeray
Shahaji Patil News : ‘शहाजीबापू, आता निधी नको, पाणी द्या'; टंचाईच्या परिस्थितीने सांगोल्यातील शेतकरी खवळला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दडपशाहीवर प्रशासनाने चालू नये. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संपूर्ण महाराष्ट्रात जेसीबीने स्वागत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही जेसीबीच्या मदतीने स्वागत करण्यात येत आहे. या नांदेड शहरात आम्हीही उद्धव ठाकरे यांचे ११ जेसीबीच्या साहाय्याने स्वागत करणार होतो. मात्र, खुद्द एसपींनी आम्हाला जेसीबी काढून घ्या; अन्यथा मला कारवाई करायला भाग पाडू नका, असे सांगितले. पोलिस प्रशासन शिंदेंच्या दबावाला बळी पडत असून आम्ही सर्व शिवसैनिक त्याचा निषेध करत आहोत, अशी भावना स्थानिक शिवसेना नेत्याने व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com