शिवसेना-भाजपचे भांडण मिटवून मी त्यांना एकत्र आणणार

प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं यासाठी मी जाहीर भूमिका मांडली आहे, त्यांनी सोबत यावं ही माझी प्रामाणिक इच्छा. (Ramdas Athawale)
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेना-भाजप या दोन जुन्या पारंपारिक मित्रांमध्ये सध्या जे भांडण, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते थांबले पाहिजेत. (Ramdas Athawale) मी हे भांडण मिटवून दोघांना एकत्र आणणार असा दावा, (Bjp) केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. (Shivsena) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना वाईट बोलण्यापासून रोखले पाहिजे, शिवीगाळ करणे ही आपली संस्कृती नाही, असेही आठवले म्हणाले.

औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना आठवले यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील ताणले गेलेले संबंध, सरकार पाडण्यावरून संजय राऊत यांनी केलेले आरोप, ते पुन्हा एकदा ऐक्याची हाक या विषयावर सविस्तर मते मांडली. आठवले म्हणाले, राज्यात सध्या जे चित्र आहे, ते काही जनतेच्या हिताचे नाही. शिवसेना-भाजप यांच्या भांडणात राज्याचे नुकसान होत आहे हे दोन्ही पक्षांनी लक्षात घ्यायला हवे. मी स्वतः या दोन पक्षांमध्ये समेट घडवून त्यांना एकत्र आणणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाडण्यासाठी केंद्राकडून ईडीचा वापर केला जातो हा आरोप चुकीचा आहे. हे सरकार पाडण्याची आमची भूमिका नाही संजय राऊतांचे आरोप खोटे आहेत. चौकशी करून सरकार पडत नसते , ते त्यांच्या कर्मानेच पडेल. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आघाडी सरकार पडण्याचे आरोप बिनबुडाचे असून आघाडी सरकारकडून विकास कामेच होत नसल्याचा आरोप देखील आठवले यांनी केला.

हे सरकार मॅनेजमेंट नाही करत तर एकमेकांना मॅनेज करत आहे, त्यातच त्यांचा वेळ जातोय असा टोला देखील त्यांनी लगावला. आंबेडकरी ऐक्यावर बोलतांना आठवले म्हणाले, पक्ष वाढवायला सर्वांना एकत्र आणायचे असेल तर, आपल्यातली गटबाजी दूर केली पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी ऐक्य वाढवण्यावर लक्ष दिले पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचा फायदा होत नाही.

Ramdas Athawale
महाविकास आघाडी सरकारने वैधानिक महामंडळ, मराठवाडा वाॅटरग्रीडचा खून केला..

आंबेडकरी ऐक्यासाठी पुन्हा एकदा दलित पँथर स्थापन करण्याची तरुणांमध्ये चर्चा आहे. प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं यासाठी मी जाहीर भूमिका मांडली आहे, त्यांनी सोबत यावं ही माझी प्रामाणिक इच्छा असल्याचेही आठवले यांनी सांगितले. नारायण राणे यांच्या घराची पाहणी कशासाठी असा सवाल करतांनाच महानगर पालिकेने परवानगी दिली तेव्हाच राणेंनी बंगला बांधला असेल, मग आता नव्याने पाहणी कशासाठी? असा सवाल करत आठवले यांनी सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com