
Beed, 27 December : बीड जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहेत, त्यांनी शस्त्राचं एवढं ओंगळवाणं प्रदर्शन केलं आहे. लोकांना धमकावण्यासाठी शस्त्राचा वापर केला जात आहे, त्यामुळे आता आपल्याकडे शस्त्र आहे, हे सांगायला लाज वाटू लागली आहे. भले सरकारने मला पैसे दिले नाही तरी चालेल. पण, हे शस्त्र मला आता नको, अशी माझी मानसिकता झाली आहे, अशी उद्विग्न भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली.
प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले, मी उद्या संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन माझे शस्त्र आणि परवाना जमा करणार आहे. ते शस्त्र सरकारनेच विकत घेऊन दोन पैसे मला दिले, तर या वयात त्या पैशांचा मला उपयोग होईल. अंजली दमानिया यांनी हे सर्व उघडकीस आणल्यापासून शस्त्रपरवाना ज्याचा मी कधीच गैरवापर केला नाही, त्याची मला लाज वाटू लागली आहे. भले मला सरकारने त्याचे पैसे दिले नाही तरी चालेल. पण हे शस्त्र मला आता नको, अशी माझी मानसिकता झाली आहे.
अंजली दमानिया यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, ते पाहून मी माझा शस्त्रपरवाना परत करण्याच्या मनःस्थितीत आहे. कारण त्या शस्त्राचा आधार वाटण्याऐवजी त्यामुळे बदनामी फार व्हायला लागली आहे. मी शेती करत असताना ते शस्त्र घेतले होते. आता मी शेती करत नाही. पण प्रत्येक निवडणुकीच्या (Election) वेळी शस्त्र जमा केलेले आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
प्रकाश महाजन म्हणाले, अलीकडे स्टेट्स सिम्बॉल म्हणून शस्त्राचा वापर होत आहे. ज्यांना खरंच शस्त्राची गरज नाही. तसेच शस्त्र हताळण्यासाठी तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या योग्य आहे की नाही पाहिले पाहिजे. सरकारने आहे, त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली तर बीड जिल्ह्यात बारासुद्धा शस्त्रपरवानाधारक टीकणार नाहीत. मी लोकसभा निवडणुकीत जमा केलेले शस्त्र विधानसभा निवडणूक असल्यामुळे परत आणलेच नाही. ते अजूनही सरकारकडेच जमा आहे. त्यामुळे मी माझा शस्त्रपरवाना सरकारला परत करणार आहे.
बीड जिल्ह्यातील सध्याचे वातावरण आणि संतोष देशमुख यांची ज्या अमानुषपणे हत्या झाली, ती माणुसकीला काळिमा फासणारी घटना होती. या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमावा. त्यातून बीडची कायदा आणि सुव्यवस्था सुधारली पाहिजे. बीडचा इतिहास असा नाही, तो खूप गौरवशाली आहे. वाळू आणि वीटमाफिया यांना वेसन घातली, तर निश्चितपणे गुन्हेगारीला आळा बसेल. सरकारने मनात आणले तर संतोष देशमुख खून प्रकरणातील मास्टर माईंडला अगदी २४ तासांत अटक करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.