Pankaja Munde Beed Politics: 'मला जेव्हा बोलायचं आहे तेव्हा बोलेन'; पंकजा मुंडेंच्या मनात नक्की चाललयं काय?

Beed Politics: पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मंगळवारपासून (२० जून) बीडमध्ये ‘संपर्क से समर्थन’ या अभियान सुरु केलं आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde sarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde Parali Politics: गेल्या काही महिन्यांपासून नाराजीच्या चर्चा असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी नुकतीच बीडमध्ये एक मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून त्या बीडमधील प्रत्येक नागरीकाला भेटणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. भाजी विक्रेत्यापासून शेतकरी, लाँड्रिवाला अश सर्वांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) भेटणार आहे. त्यामुळे सध्या बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या या मोहिमेची चर्चा सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मंगळवारपासून (२० जून) बीडमध्ये ‘संपर्क से समर्थन’ या अभियान सुरु केलं आहे. या मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी परळीतील ग्रामस्थ, छोटे व्यापारी आणि दुकानदारांच्या भेटीगाठी घेतल्या.त्यांच्या या अभियानाला मोठा प्रतिसादही मिळत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या मोहिमेला पाठिंबा देत त्यांच्या अडचणी आणि समस्याही पंकजा मुंडेंसमोर मांडल्या.

Pankaja Munde
Pankaja Munde- BJP Politics: 'पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला बळ मिळाल्याचं लवकरच दिसेल'; भाजप नेत्याचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या संकल्पनेतून'संपर्क से समर्थन' ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यात भाजपकडून 20 ते 30 जून या काळात ही मोहीम राबवली जाणार आहे. यानुसार पंकजा मुंडेंनी कालच परळीतून या मोहिमेला सुरुवात केली.परळीतील सर्व सामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, लाँड्रीवाला, फुल विक्रेते यांच्याशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला.मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात राज्यात केलेल्या कामगिरीचा आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पंकजा मुंडेंनी स्वत: आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या अभियानाच्या निमित्ताने मोदी सरकारच्या कामगिरीचा गेल्या नऊ वर्षातील लेखाजोखा मांडणारे पॅम्पलेट परळीतील दुकानदारांना वाटले.

दरम्यान, 3 जून रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. गेल्या 4 वर्षामध्ये अनेक खासदार आणि आमदार झाले आहेत. पण मी पात्र नसेल तर चर्चा होणारच, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर पंकजा मुंडेंना पुन्हा त्यांना नाराजीबाबत विचारले असता, ''मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन,'' अशी सूचक प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. विधान पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला आहे. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com