Ajit Pawar : अजित पवारांना 'सुप्रीम' नोटीस; राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर कोर्टात नेमकं काय झालं?

Supreme Court : सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

या सुनावणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची प्रकरणे एकाच दिवशी ऐकू असे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. त्यानुसार कोर्टाकडून अजित पवार यांच्यासह त्यांना साथ देणाऱ्या आमदारांना नोटीस पाठवली आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत जयंत पाटील Jayant Patil यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

या सुनावणीत कोर्टाने शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रेतीची दोन्ही प्रकरणे एकाच दिवशी ऐकू, असे सांगितले. तसेच कोर्टाने पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होईल, असे स्पष्ट केले.

राज्यात दोन वर्षांत दोन मोठे पक्ष फुटले. फुटीर गटांतील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका मागे उरलेल्या दोन्ही पक्षांकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही.

आता झालेल्या सुनावणीत दोन्ही प्रकरणे एकापाठोपाठ ऐकू असे कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणी होणाऱ्या पुढील 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत कोर्ट मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar NCP
Omi Kalani : ओमी कलानींच्या आमदारकीचा गोव्यातून निर्णय; उल्हासनगरमध्ये घडामोडींनी वेग

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वातील गटाला दिले. यावर आठवड्यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोर्टाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्हाबाबत दोन आठवड्यात आपले उत्तर द्यावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच अजित पवार गटाच्या उत्तरावर शरद पवार गटालाही आपले म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने आठवड्याचा कालावधी दिला आहे. आता चिन्ह आणि पक्षाबाबत पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Ajit Pawar NCP
Video Narhari Zirwal : मुलगा गोकुळ पवारसाहेबांच्या पक्षातून लढण्याची चर्चा, अखेर झिरवाळांनी थेटच सांगितलं; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com