NCP MLA News : मतदारांची इच्छा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करू : राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

राज्यामध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर आमदार सोळंके भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले होते
Prakash Solanke
Prakash SolankeSarkarnama
Published on
Updated on

माजलगाव (जि. बीड) : माजलगाव मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल तर आगामी काळात भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (If the voters want, we will join the BJP : MLA Prakash Solanke)

माजलगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या विशिध प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी सोळंके महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे. याच पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळंके यांना पत्रकारांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला होता. त्या वेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातील माझ्या मतदारांची तशी इच्छा असेल तर भाजपतही जावू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Prakash Solanke
Pawar Vs BJP : पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याने केली आगळी वेगळी मागणी

दरम्यान, पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले प्रकाश सोळंके यांच्या या विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यामध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर आमदार सोळंके भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले होते, तर आता खुद्द आमदार सोळंके यांनीच केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. या पत्रकार परिषदेस दयानंद स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे, शहराध्यक्ष खलील पटेल, राजेश मेंडके यांची उपस्थिती होती.

Prakash Solanke
BJP Leader's Secret Explosion: फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा गौप्यस्फोट : ‘महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या उंबरठ्यावर’

मला बदनाम करण्याचे षडयंत्र : सोळंके

माजलगाव मतदार संघाचा आमदार असल्याने मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांना मतदारसंघाच्या विकासासाठी भेटावेच लागते. मला राजकीय भविष्यासाठी राजकारणामध्ये अनेक राजकीय पक्षाचे पर्याय आहेत. परंतु भारतीय जनता पक्षातील लोकांना माझी भीती वाटते. विनाकारण माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही सुरू असलेली चर्चा मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com