
Parbhani News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Medical College) स्थापनेकरिता राज्य सरकारने मंजुरी बहाल केली आहे, त्यासाठी जागा व पुरेसा निधी सुद्धा उपलब्ध केला आहे. त्यामुळे आता झारीतील शुक्राचार्यांनी या महाविद्यालयाच्या स्थापनेत कोणताही अडथळा आणू नये, अन्यथा त्या शक्ती विरोधात एक मे पासून मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जून पासून सुरू होणार आहे. (Parbhani) प्रवेश प्रक्रिया संदर्भात हालचाली सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहेत. असे असताना सुद्धा उच्चपदस्थ पातळीवरून छोट्या व किरकोळ गोष्टी पुढे करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात हेतूत: अडथळे आणले जात असल्याचा आरोप जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला.
वास्तविकता खाजगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना स्थापनेसह मंजुरी व प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात अटी व शर्ती या समान असताना सुद्धा परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास किरकोळ कारणे दाखवून कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. (Marathwada) वैद्यकीय व शिक्षण मंत्रालयाने व उच्च पदस्थ काही अधिकाऱ्यांनी यात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, हे प्रकार पूर्णतः निषेधार्य आहेत, चुकीचे आहेत.
या जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून या प्रक्रियेत आता कोणीही अडथळे निर्माण करू नये, असेही जाधव यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व संबंधित मंत्रालयाच्या तीव्र उदासीनतेमुळेच हे प्रकार सुरू आहेत का? की यात उच्च पातळीवर मोठी उलाढाल होते आहे? इतपत शंका उद्भवल्या आहेत.
या अनुषंगाने येत्या चार दिवसात गांभीर्याने विचार मंथन करीत सर्वपक्षीय नेते मंडळींसह आम्ही परभणीकर अक्षरशः रस्त्यावर उतरून या अज्ञात शक्तीविरोधात प्रखरपणे आंदोलन उभारू असा इशाराही खासदार जाधव यांनी दिला. आमदार सुरेश वरपूडकर माजी महापौर भगवानराव वाघमारे ,डॉक्टर विवेक नावंदर पंजाबराव देशमुख समशेर वरडपूडकर आदींची यावेळी उपस्थित होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.