Maharashtra Politics : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पोराला...; बंडू जाधवांचा ठाकरेंना घरचा आहेर

Uddhav Thackeray : सत्तेचा लाभ घेता आला नाही, अशीही जाधव यांनी खंत व्यक्त केली
Bandu Jadhav
Bandu JadhavSarkarnama

MP Bandu Jadhav on Uddhav Thackeray : सात महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार फुटून भाजपला मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटास शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हही दिले. परिणामी ठाकरे गटावर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यातूनही ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आपली बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी ठाकरे गटाने चांगलीच ताकद लावल्याचे दिसून येत आहे.

सध्या ठाकरे गटाकडे ५५ मधून आता १५ आमदार आणि १८ मधून फक्त पाच खासदार राहिले आहेत. ते ठाकरे गटाची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परभणीचे (Parbhani) खासदार बंडू जाधवांनी आज शिंदे गटाने का गद्दारी केली याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत टीका केली. सरकार असूनही लाभ घेता आला नसल्याची खंतही जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

Bandu Jadhav
Sanjay Raut News : राऊतांची वाचाळ बडबड; खासदारकीचा राजीनामा देवून ग्रामपंचायत निवडून दाखवा

खासदार बंडू जाधव (Bandu Jadhav) म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते. त्या काळात कोरोना सुरू झाला. कोरोनाचा काळ असाच गेला. त्या काळात ज्या पद्धतीने सत्तेचा लाभ मिळायला हवा होता, तो आम्हाला मिळालाच नाही. यासारखे दुःख दुसरे कुठलेच असू शकत नाही. त्या काळात उद्धव साहेबांनी पक्ष संघटनेकडे ज्या पद्धतीने बघायला पाहिजे होते, किंवा कुणाला तरी बघायला अधिकार द्यायला हवे होते, तसे काही घडले नाही. त्यामुळेच आमच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या चोरांना संधी मिळाली."

Bandu Jadhav
Kapil Sibal News : केंद्र सरकारच्या विरोधात कपील सिब्बल मैदानात; केली मोठी घोषणा

जाधव यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करून घरचा आहेरही दिला. उद्धव ठाकरे यांना उद्देशून जाधव म्हणाले, "तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते तर पोराला मंत्री करायला नको होते. पोराला मंत्री करायचे होते तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होते. पण दोघांनीही खुर्च्या आटवल्याने चोरांची भिती वाढली. बाप गेला तर मुलगा वरचढ होईल, त्याच्यापेक्षा मी जर वेगळी चूल मांडली तर काय होईल, या विचारातूनच गद्दारी झाली."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com