Aurangabad Political News : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे संधी मिळेल तेव्हा सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदरांना चिमटे काढत असतात. मार्मिक आणि मर्मावर बोट ठेवत त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर मग त्यांना अनेकदा निरुत्तरही व्हावे लागते. (Aimim News) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पोलिस आयुक्तालयात सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात इम्तियाज यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना टोला लगावण्याची संधी हेरली.
गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस शहरातील दारूची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आपल्या भाषणात केली होती. याचा धागा पकडत इम्तियाज म्हणाले, माझे प्रिय मित्र चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या मागणीला माझा पुर्ण पाठिंबा आहे. पण दारुची दुकाने फक्त गणेशोत्सवाच्या काळातच नाही, तर कायमची बंद झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे सांगत खैरेंना चिमटा काढला.
त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड (Dr.Bhagwat karad) यांच्याकडे वळवला. आमदारकीची पाच आणि आता खासदार म्हणून चार अशी एकूण ९ वर्षापासून मी शांतता समिती, समन्वय समितीच्या बैठकांना उपस्थितीत लावत आहे. पण नऊ वर्षात माझ्या असे निदर्शनास आले, की दर बैठकीत गणेशोत्सवाच्या काळात शहरातील खड्डे कधी बुजवणार? हा प्रश्न उपस्थिती केला जातो. (Imtiaz Jaleel) कराडसाहेब मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, आपल्या देशाचे यान आता चंद्रावर पोहचले आहे, पण शहरातील रस्त्यांवरचे खड्डे कधी बुजवणार?
जिल्हाधिकीरी आस्तीककुमार पांडेय यांच्याकडे कटाक्ष टाकत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी ४० कोटी रुपये आले आहेत. त्यातून रंगरंगोटी कमी झाली तर चालेल, पण रस्त्यांवरील खड्डे तेवढे बुजवा, अशी सूचना इम्तियाज यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळातच ईद ए मिलाद असल्यामुळे या निमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक मुंबईप्रमाणे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काढता येईल का? याचा देखील विचार धर्मगुरुंनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन करावा, असा प्रस्ताव देखील इम्तियाज यांनी यावेळी ठेवला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.