Abdul Sattar News: इम्तियाज जलील यांनी दोस्ताना निभावला : सत्तारांच्या सिल्लोडकडे बघितलंही नाही; ना उमेदवार, सभा ना!

Sillod Municipal Election 2025 AIMIM no candidates:गेल्या वीस वर्षांपासून अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कुटुंबाची सिल्लोड नगर परिषदेवर एकहाती सत्ता आणि सर्वाधिक काळ नगराध्यक्ष पद त्यांच्या घरातच राहिले आहे.
Sillod Municipal Election 2025 AIMIM no candidates
Sillod Municipal Election 2025 AIMIM no candidatesSarkarnama
Published on
Updated on

Aimim politics News: एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. 'मेरे बडे भाई, असा आदरयुक्त उल्लेख इम्तियाज जलील यांच्याकडून सत्तारांचा अनेकदा होतो. तर अब्दुल सत्तार यांनीही आपण काँग्रेसमध्ये असतानाही लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मदत केली होती, असे जाहीरपणे सांगितले आहे. दोघांमधील या मैत्रीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक राजकीय विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे.

हाच मैत्री धर्म इम्तियाज जलील यांनी नगरपालिका निवडणुकीत निभावल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या एमआयएमने तब्बल 22 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 300 हून अधिक नगरसेवक पदाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. स्वतः इम्तियाज जलील यांनी राज्यभरात दौरे करून प्रचार सभा, बैठका,कॉर्नर बैठका,पदयात्रा काढत वातावरण निर्मिती केली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह सिल्लोडमध्ये एमआयएमने फारसे उमेदवार दिले नाही. नगराध्यक्ष पदासाठीही एमआयएमचा सिल्लोडमध्ये उमेदवार नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सिल्लोड नगर परिषदेत अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपने मनोज मोरेलू यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वीस वर्षांपासून अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कुटुंबाची सिल्लोड नगर परिषदेवर एकहाती सत्ता आणि सर्वाधिक काळ नगराध्यक्ष पद त्यांच्या घरातच राहिले आहे. भाजपने सत्तार यांना रोखण्यासाठी जोर लावलेला असताना त्यांच्या अडचणी वाढू नये याची काळजी मित्र म्हणून इम्तियाज जलील यांनी घेतल्याचे दिसते.

Sillod Municipal Election 2025 AIMIM no candidates
Pune Election 2025: 'लाडक्या बहिणी' ठरणार गेमचेंजर; गावचा कारभारी कोण? 5 हजार महिलांची मते निर्णायकी ठरणार

सिल्लोडमध्ये एमआयएमने उमेदवार का दिला नाही? यासंदर्भात सरकारनामाने इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी एकूणच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोजके उमेदवार दिले असल्याचे स्पष्ट केले. सिल्लोडमध्ये आम्ही नगरसेवक पदासाठी दोन उमेदवार दिले आहेत. परंतु सिल्लोडच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात मी कुठेही प्रचार सभा घेतली नाही. जिल्ह्याची जबाबदारी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

एक दोन उमेदवार काही नगर परिषदांमध्ये दिलेले असल्यामुळे मी संपूर्ण लक्ष इतर जिल्ह्यांमध्ये केंद्रित केले होते. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला येऊ शकणार नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ही माझ्या एकट्यावर होती. वेळ कमी आणि अनेक जिल्ह्यांमध्ये माझी सभा व्हावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होत असल्याने मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकही सभा घेतली नाही.

त्यामुळे सिल्लोडमध्ये सभा घेतली नाही असे म्हणता येणार नाही. शिवाय या निमित्ताने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या कामाची कसोटी मला पाहण्याची संधी मिळाली. उमेदवारांची संख्या कमी असताना ते त्यांना निवडून आणू शकतात का? हे देखील मला पाहिजे असल्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोडून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सभा बैठका आणि प्रचार फेऱ्या केल्या,असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com