

Women’s vote as gamechanger in pune elections: पुणे जिल्ह्यात 12 नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी मतदान नुकतेच झाले. यात चार नगरपरिषदांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे दिसले. यामुळे या चारही नगरपरिषदांच्या निवडणुकीत महिला किंगमेकर ठरणार आहे. गावाची सत्ता कुणाच्या हाती असणार यासाठी महिलांची मते निर्णायकी ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा व तीन नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची या दोन नगरपरिषदांची मतदानाची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर मंगळवारी (दि. २) उर्वरित १२ नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. त्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले.
पुणे जिल्ह्यातील एकूण मतदानात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या केवळ पाच हजारांनी कमी आहे. त्यामुळे बहुतांश नगरपरिषदांमध्ये महिला मतदार कुणाच्या बाजूनं कौल देणार हे महत्त्वाचा ठरणार आहे. इंदापूर, जेजुरी, भोर आणि लोणावळा या चार नगरपरिषदांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदार पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी निकाल महिला ठरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण ३ लाख ६ हजार ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यात १ लाख ५५ हजार ८३५ पुरुष तर १ लाख ५० हजार ८७६ महिला मतदारांचा मतदाना केले. अन्य ११ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यावरून पुरुष व महिला मतदारांमध्ये केवळ पाच हजारांचा फरक आहे. त्यामुळे बहुतांश नगरपरिषदांमध्ये निकाल महिलांच्या मतदानावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक ६४ हजार ६७९ मतदार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत होते. त्यातील ३१ हजार ८४६ मतदारांनी मतदान केले. त्यात १६ हजार ५५५ पुरुष तर १५२९१ महिलांचा समावेश आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत हे मतदान केवळ ४९.२४ टक्के इतके आहे.
जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान याच नगर परिषदेत झाले आहे. तर इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. येथे एकूण मतदारांची संख्या २४ हजार ८२९ असून १९८३७ मतदारांनी मतदान करण्याचा हक्क बजावला. त्यात ९ हजार ७५० पुरुष व १० हजार ८३ महिला मतदारांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.