Imtiaz Jaleel : पराभवानंतरही आमची ताकद वाढली, इम्तियाज जलील यांचा दावा; एमआयएम सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार!

Local Body Election 2025 : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने मुंबई वगळता राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली.
AIMIM Maharashtra Local Body Election News
AIMIM Maharashtra Local Body Election NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पक्षाची ताकद वाढल्याचा दावा करत स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

  2. मराठवाड्यात एमआयएमचा प्रभाव वाढत असून, पक्ष स्वतंत्र शक्ती म्हणून स्थानिक राजकारणात उतरायला सज्ज आहे.

  3. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

AIMIM News : लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आमचा पक्ष कुमकूवत झाला, असं जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. विजयी उमेदवार आणि आमच्यातील अंतर पाहिले तर तुम्हाला ते लक्षात येईल. मी लोकसभा निवडणुकीत एकटा लढलो तर माझ्या विरोधात सत्ताधारी तीन पक्षाच्या महायुतीचा उमेदवार होता. विधानसभेला विजयी उमेदवार आणि माझ्या पराभवातील अंतर दोन हजारापेक्षाही कमी होते. पराभवानंतरही आमची ताकद शहरी-ग्रामीण दोन्ही भागात वाढली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, अशी घोषणा इम्तियाज जलील यांनी केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने मुंबई वगळता राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या बैठकीतील चर्चेवर पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीपुर्वी ग्रामीण भागात आमची ताकद नाही, असे आमचेही मत होते. पण लोकसभेतील विजयाने आम्हाला खात्री पटली की आमचा पक्ष आता ग्रामीण भागातही पोहचला आहे.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला मिळालेली मतं पाहता ते पुन्हा सिध्द झाले आहे. या जोरावरच आम्ही नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्तास एमआयएम कोणत्याही पक्षाशी युतीचा आमचा निर्णय किंवा चर्चा सुरू नाही. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून ठरवण्याचे अधिकार दिले आहे. निवडणुका आम्ही सगळीकडे लढवणार आहोत.

AIMIM Maharashtra Local Body Election News
Imtiaz Jaleel News : 'रोडकरी' नितीन गडकरींना इम्तियाज जलील यांचे आव्हान; छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्यावरून एकदा प्रवास कराच!

कार्यकर्त्यांचा तसा आग्रह देखील आहे. परंतु जे असा आग्रह धरत आहेत, त्यांच्यावर रिझल्ट दाखवण्याची जबाबदारी आम्ही टाकली आहे. पराभव झाला तरी तो मोठ्या फरकाने होऊ नये. अन्यथा निकालाच्या दुसऱ्या दिवशीच एमआयएमची संपूर्ण कार्यकारिणी, पदाधिकारी बरखास्त केले जातील, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

AIMIM Maharashtra Local Body Election News
AIMIM Dhule mass resignation : 'AIMIM'ला मोठा धक्का; धुळे कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा...

माझ्या मुलाने राजकारणात येऊ नये..

तुमच्या मुलाने राजकारणात यावे असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न इम्तियाज जलील यांना विचारला. तेव्हा राजकारण खूप खालच्या स्तरावर गेले आहे, माझं वैयक्तिक मत आहे की माझ्या मुलाने या घाणेरड्या राजकारणात येऊ नये, असे स्पष्ट मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. राज्यातील राजकारणाचा स्तर पुढील काळात आणखी खाली येणार आहे, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली.

FAQs

1. इम्तियाज जलील यांनी काय घोषणा केली?
त्यांनी एमआयएम पक्षाची ताकद वाढल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

2. ही घोषणा कुठल्या प्रदेशाशी संबंधित आहे?
ही घोषणा मुख्यतः मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर या भागातील राजकारणाशी संबंधित आहे.

3. एमआयएम पक्षाची सध्याची स्थिती कशी आहे?
एमआयएम पक्ष मराठवाड्यात आणि शहरी भागांमध्ये आपला जनाधार वाढवत आहे.

4. इम्तियाज जलील कोण आहेत?
ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमी (AIMIM) चे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत.

5. या घोषणेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
स्थानिक निवडणुकांमध्ये एमआयएमचा प्रभाव वाढल्याने इतर पक्षांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो आणि नवी राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com