Imtiaz Jalil News : `हम इतने भी शरीफ नही`, नामांतराविरोधात गुरुवारी कॅन्डल मार्च ...

Aimim : या शहरावर, नावावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वेळ मिळेल तेव्हा या उपोषणस्थळावर येवून बसावे.
Imtiaz Jalil Sambhajinagar News
Imtiaz Jalil Sambhajinagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : हुकूमशाही पद्धतीने लादलेले नामांतर आम्हाला मान्य नाही, त्याला विरोध म्हणून आम्ही साखळी उपोषणाला बसलो आहोत. (Aimim) एकाच ठिकाणी बसल्यामुळे प्रशासन आणि सरकार हे समजत असेल किती दिवस बसणार? पण `हम इतने भी शरीफ नही है जितना वो समझ रहे है`, गुरुवारी ९ रोजी आम्ही या ठिकाणाहून उठून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढणार आहोत.

Imtiaz Jalil Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News : नामांतरावरून राजकारण पेटले, शिरसाट-इम्तियाज भिडले...

उपोषणाच्या मंडपातून बाहेर पडणार आहोत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिले, त्यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती पेटवून न्याय मागणार असल्याचे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आज जाहीर केले. नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणात ते उपस्थितांना संबोधित करत होते. (Aurangabad)

इम्तियाज जलील म्हणाले, या शहराचा इतिहास मिटवण्याचे काम सुरू आहे. कुणीतरी एक नेता ३५ वर्षापुर्वी येतो आणि या शहराचे नाव बदलण्याची घोषणा करतो. त्याच्या भावना जपण्यासाठी सरकार हुकूमशाही पद्धतीने या शहराचे नाव बदलते पण आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू केली आहे. त्यासोबतच न्यायालयाचा लढा देखील लढावा लागणार आहे.

या शहरावर, नावावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वेळ मिळेल तेव्हा या उपोषणस्थळावर येवून बसावे. उद्या येणारी पिढी जेव्हा आम्हाला विचारेल की शहराचे नाव बदलले गेले तेव्हा तुम्ही काय करत होतात? तर आम्ही किमान हे सांगू शकू की आम्ही रस्त्यावर उतरून लढलो होतो. माझ्यावर दबाव आहे, पण मी कुणाच्या दबावापुढे झुकणार नाही. औरंगाबाद नाव कायम ठेवण्यासाठी आपण पक्ष, भेद विसरून एकजूट दाखवली पाहिजे.

जेणेकरून उद्या जर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी एखाद्या शहराचे नाव बदलायचे ठरवले तर त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या लढ्याचे चित्र उभे राहिले पाहिजे. शहरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घेत आपल्याला हा लढा सुरू ठेवायचा आहे. जोपर्यंत मी इथे उभा आहे, तोपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार या शहरात घडू देणार नाही. गुरूवारी शांततामय मार्गाने कॅन्डल मार्च काढायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपण सगळे याच ठिकाणी साखळी उपोषणाला येवून बसणार आहोत, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com