Chhatrapati Sambhajinagar News : नामांतरावरून राजकारण पेटले, शिरसाट-इम्तियाज भिडले...

Shivsena : देशातले हे पहिले असे उपोषण असेल जे बिर्याणी खावून केले जात आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat News
Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat NewsSarkarnama

Marathwada Politics : शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. मात्र यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. विशेषत: (Shivsena) शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना आव्हान दिले जात असल्यामुळे संघर्षाचा भडका केव्हाही उडू शकतो.

Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat News
Atul Save News : मी मंत्री असलो तरी छत्रपती संभाजीनगरच्या मुद्यावर बोलवालं तिथे येईन..

पोलिसांनी राजकीय नेत्यांना भडक विधाने न करता शहरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी त्याला या दोन्ही नेत्यांनी फारसे मनावर घेतल्याचे दिसत नाही. (Sanjay Shirsat) नामांतराच्या विरोधात इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.

परंतु त्यामध्ये काही तरुणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने वातावरण अधिकच तापले. त्यानंतर शिवसेनेने सकल हिंदु एकत्रिकरण समितीच्या माध्यमातून एमआयएमला जशासतसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. या मेळाव्यात संजय शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर खुल्ताबाद येथून हलवा आणि ओवेसींच्या हैदराबादला न्या, अशी खळबळजनक मागणी केली.

एवढेच नाही, तर आता निजामाचा काळ नाही, त्याकाळात तुम्ही हिंदूवर अत्याचार केले, पण आता आमचे राज्य आहे, तेव्हा आम्ही जे सांगू तेच होईल, असा गर्भीत इशारा शिरसाट यांनी दिला. या शहरात आम्ही २२ दंगली पाहिल्या आहेत, यांना आम्ही कधीही पुरून उरू त्याची काळजी तुम्ही करू नका. भविष्यात हे मोठे संकट समोर आहे, त्याचा सामना करायचा असेल तर आपल्यात एकजूट असणे आवश्यक आहे.

साखळी उपोषणाच्या ठिकाणी बिर्याणी आणली जात आहे, देशातले हे पहिले असे उपोषण असेल जे बिर्याणी खावून केले जात आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. त्याला इम्तियाज जलील यांच्याकडून देखील प्रत्युत्तर मिळाले. औरंगजेबाशी आमचा संबंध जोडू नका, आमचा फक्त नामांतराला विरोध आहे. हो उपोषण स्थळी आम्ही बिर्याणी आणली होती, नान खलिया देखील आणणार आहोत, तुम्हाला खायला यायचे असेल तर या.

Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat News
Vasant More News: मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ

औरंगजेबाची कबर हलवण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली. बाळासाहेब ठाकरेंनी शहराचे नाव बदलले तेव्हा कोणाची परवानगी घेतली नव्हती. पण आता ती शिवसेना राहिली नाही, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला. एकंदरित नामांतरावर राजकारण करत आगामी निवडणुकीत आपली वोट बॅंक मजबुत करण्याचे प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून पुढील काही दिवस होत राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com