Imtiaz Jaleel on Sambhaji Raje Chhatrapati : 'संभाजीराजे छत्रपती हे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का..? असा प्रश्न पडतो; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान!

Imtiaz Jaleel on Vishalgarh Encroachment Case : लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आता कुठे आहेत? असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
Imtiaz Jaleel on Sambhaji Raje Chhatrapati
Imtiaz Jaleel on Sambhaji Raje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jaleel News : 'विशाळगडावर झालेले अतिक्रम हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत घरांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, पण ज्या पद्धतीने त्यांनी विशाळगडावरील हल्लेखोरांचे नेतृत्व केले. ते पाहता संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? असा प्रश्न पडतो.', अशा शब्दांत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला आहे.

संभाजीराजे छत्रपती(Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी मला एक पुस्तक भेट दिले होते, पण आता ते त्यांनीच नीट वाचण्याची गरज असल्याचा टोलाही इम्तियाज यांनी लगावला. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटायला लागले आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शेकडो आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करत कारवाई केली.

Imtiaz Jaleel on Sambhaji Raje Chhatrapati
Asaduddin Owaisi : इम्तियाज जलील बॅक टू विधानसभा, ओवेसींनी सांगितले तयारीला लागा...

एमआयएमने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत विशाळगडावरील आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 'संभाजीराजे यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, पण तो आता राहिला नाही. ज्या पद्धतीने आंदोलकांनी विशाळगडावर गुंडागर्दी केली, मुस्लीम महिला, त्यांच्या कुटुंब आणि घरावर दगडफेक करत हल्ले चढवले ते पाहता इथे जंगलराज आहे की काय? असे वाटले.'

Imtiaz Jaleel on Sambhaji Raje Chhatrapati
Shahu Chhatrapati News : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवर शाहू छत्रपतींनी व्यक्त केली तीव्र नाराजी, म्हणाले...

याशिवाय 'संभाजीराजे छत्रपती यांनी या हल्लेखोर आंदोलकांचे नेतृत्व करणे योग्य आहे का? ते खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने पडतोय. विशाळगडावर काही अतिक्रमण असेलही पण ते हटवण्याची काही पद्धत नियम आहे की नाही? कुणीही कायदा हातात घेईल आणि लोकांच्या घरावर हल्ले करून गाड्यांची नासधूस करेल हे योग्य आहे का?' असा सवाल इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) यांनी उपस्थितीत केला.

याचबोरबर, 'लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आता कुठे आहेत? ज्या मौलानांनी मुस्लिमांना महाविकास आघाडीला मतदान करायला लावले, ते आता कुठे गेले आहेत? या राजकीय पक्षांना फक्त मुस्लिमांची मत हवी आहेत, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com