Imtiaz Jalil News : दिल्लीला गेल्यावर आंदोलनाचे काय होणार ? इम्तियाज यांना चिंता..

Marathwada : दिल्लीत उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी इम्तियाज जलील हे रवाना होणार आहेत.
Imtiaz Jalil News, Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jalil News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Aimim : खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नामांतरविरोधी आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक दिवशी आंदोलकांचा उत्साह वाढवण्यासाठी इम्तियाज (Imtiaz Jalil) यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली, तिथे बसले आणि मार्गदर्शनही केले. नुकत्याच काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु दिवसापाठोपाठ दिवस जात असतांना जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलनासाठी उभारण्यात आलेली गर्दी ओसरू लागली आहे.

Imtiaz Jalil News, Chhatrapati Sambhajinagar
Dr.Bhagwat Karad News : औरंगजेबाची कबर हलवलीच पाहिजे, मागणीला माझेही समर्थन..

दिल्लीत उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. (Aimim) त्यासाठी इम्तियाज जलील हे रवाना होणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी आज आंदोलनस्थळी जावून अर्ध्यातासापेक्षा जास्त वेळ भाषण केले. (Marathwada) हे आंदोलन कशासाठी आहे, माझ्यावर किती दबाव आहे, आक्षेप दाखल करण्यासाठी घरोघरी जावून अर्ज भरा असे आवाहन केले. आंदोलन फसले तर लोक आपल्यावर हसतील, पत्रकार, मिडिया मला टोमणे मारतील याची जाणीव करून देत इम्तियाज यांनी काहीसे भावनिक भाषण केले.

दिल्लीला अधिवेशनासाठी गेल्यावर आंदोलनाचे काय होईल, याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आंदोलनाची हाक दिली होती. सुरूवातीला त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाचा मंडप गर्दीने भरलेला, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्याची दखल घेतांना दिसत होते. विरोधक, प्रशासन, पोलिस आणि राज्य सरकार देखील या आंदोलनाकडे डोळे लावून बसले आहेत.

पण आठवडा उलटल्यानंतर आंदोलकांचा उत्साह ओसरू लागला आहे. मंडपातली गर्दी कमी होवू लागली आहे. त्यामुळे नामांतराच्या विरोधातील आंदोलन संपुष्टात येते की काय? अशी चिंता इम्तियाज जलील यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवत होती. विरोधकांनी इम्तियाज जलील यांच्यावर नामांतराच्या विषयावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांना ते आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत, पण आंदोलनस्थळ हळूहळू रिकामे होत असल्याने त्यांची चिता वाढली आहे.

त्यामुळे आपण इथे नसलो तरी दिल्लीत दिल्लीत सुप्रीम कोर्टात नामांतरविरोधातील लढा कसा पुढे न्यायचा याची चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशनात देखील नामांतराचा मुद्दा आपण उपस्थितीत करणार आहोत. मी तिथे लढत असतांना तुम्ही मात्र हिंमत सोडू नका, आंदोलन सुरू ठेवा. मी जेव्हा तिथे टीव्हीवर पाहीन तेव्हा मला हा मंडप गर्दीने भरलेला दिसला पाहिजे, रिकामा नको, असे आवाहन देखील इम्तियाज यांनी उपस्थितांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com