Imtiaz Jalil On Prakash Ambedkar : आंबेडकरांनी केलेल्या धाडसाचं मी स्वागत करतो..

Marathwada : औरंगजेबच काय पण इस्लाममध्ये अगदी अनोळखी माणसाच्या कबरीसमोर गेल्यानंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची पद्धत.
Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Aimim News : प्रकाश आंबेडकरांनी आज औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिली, त्यांच्या या कृतीचे मी स्वागत करतो. यावरून आता त्यांच्यावर टीका होईल, त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केले जाईल, पण त्यांनी जे धाडस केले त्याचे स्वागत केले पाहिजे आणि इतरांनी देखील असे धाडसं केले पाहिजे, (Imtiaz Jalil On Prakash Ambedkar) अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आंबेडकरांचे समर्थन केले आहे.

Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad
Prakash Ambedkar Visit Aurangjeb Tomb : प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबाच्या कबरीला भेट..

गेल्या काही महिन्यांपासून औरंगजेबाचे पोस्टर झळकावणे, स्टेटस ठेवणे या सारख्या घटनांवरून राज्यातील वातावरण तापले आहे. शहरासह नगर, कोल्हापूरात औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि नव्या वादाला सुरुवात झाली.

प्रकाश आंबेडकरांनी या भेटीचे समर्थन करतांना इतिहासाचे दाखले देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. आता त्यांच्या या भेटीचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalial) यांनी देखील समर्थन केले. `सरकानामा`शी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, राज्यात जाती-धर्मांमध्ये विष कालवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. (Aimim) छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांचा इतिहास माहित नसणारे किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्यांमुळेच असे वाद निर्माण होता.

शत्रू संपल्यानंतर त्याच्यासोबतचे वैर देखील संपते अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंनी दिलेली आहे. औरंगजेबाच्या कबरीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जागा दिली होती. अफझलखानाचा वध झाल्यानंतर त्याच्या देहाची विटंबना न करता विधिवत दफन करा, असे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. पण हा इतिहास कुणाला माहित नाही.

औरंगजेबच काय पण इस्लाममध्ये अगदी अनोळखी माणसाच्या कबरीसमोर गेल्यानंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. आम्ही जेव्हा औरंगजेबांच्या कबरीला भेट दिली तेव्हा देखील आम्ही गुडघे टेकले, झुकलो अशी टीका आमच्यावर केली गेली होती. आज प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देत एक धाडस केले आहे, त्यांचे मी स्वागतच करतो, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.