Imtiaz Jaleel and Adarsh Patsanstha Depositors: आमच्यासाठी लढणारा, भिडणारा खासदार पडला... ; 'आदर्श'चे ठेवीदार ढसाढसा रडले!

Adarsh Nagari Patsanstha Depositors meet Imtiaz Jaleel : जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी धाव घेत निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल त्यांचे सांत्वन केले.
Adarsh Nagari Patsanstha Depositors meet  Imtiaz Jaleel
Adarsh Nagari Patsanstha Depositors meet Imtiaz JaleelSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. हा पराभव जितका एमआयएमच्या जिव्हारी लागला नाही, तितका तो आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्यात ठेवी अडकलेल्या ठेवीदारांच्या लागला आहे. बुधवारी जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी धाव घेत निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल त्यांचे सांत्वन केले.

वृद्ध, महिला अक्षरशः ढसाढसा रडल्या. आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी राजकारणी, सहकार क्षेत्रातील बडे नेते, पोलिस अशा सगळ्यांशीच भिडणारा, लढणारा आमचा लढवय्या खासदार पडला याचे दुःख तिथे आलेला प्रत्येकजण व्यक्त करत होता. गेल्या वर्षी उघडीकस आलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील दोनशे कोटीहून अधिकच्या घोटाळ्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

Adarsh Nagari Patsanstha Depositors meet  Imtiaz Jaleel
Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेला इम्तियाज जलील यांना लीड, आमदार प्रदीप जयस्वाल डेंजर झोनमध्ये...

आयुष्यभराच्या कष्टातून कमावलेली जमापुंजी भ्रष्ट संचालक मंडळाच्या कारभारामुळे एका क्षणात बुडाली. या धक्याने अनेकांनी आपले आयुष्य संपवले तर काहींना मानसिक तणावातून हृदयविकाराचे झटका आला आणि त्यातच दगावले. 'आदर्श'चा(Adarsh Nagari Patsanstha Depositors) घोटाळा उघडकीस आला तेव्हा सगळे ठेवीदार हवालदिल झाले होते. कुठलाच राजकीय पक्ष त्यांच्या मदतीला धावून येत नव्हता. दररोज आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाबाहेर ठेवीदार गर्दी करायचे. हक्काच्या पैशासाठी टाहो फोडायचे, पण त्यांचे ऐकणार कोणीच नव्हतं.

Adarsh Nagari Patsanstha Depositors meet  Imtiaz Jaleel
Sandipan Bhumare : भुमरे खासदार झाले, भाजपला हवंय पालकमंत्रीपद; शिरसाटांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरणार?

अशा संकटात तत्कालीन खासदार इम्तियाज जलील या ठेवीदारांच्या मदतीला धावून आले. कोणीतरी आपल्या बाजूने उभे राहात आहे, या भावनेतून हजारो ठेवीदारांना दिलासा तर मिळालाच पण लढण्याची हिंमत आली. इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) यांनी आदर्शच्या ठेवीदारांसोबत आंदोलनात उडी घेतली आणि जिल्हा प्रशासनच नाही तर राज्य सरकारही हादरून सोडले.

Adarsh Nagari Patsanstha Depositors meet  Imtiaz Jaleel
Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेला इम्तियाज जलील यांना लीड, आमदार प्रदीप जयस्वाल डेंजर झोनमध्ये...

मंत्रीमंडळ बैठकीवर मोर्चा, सहकार निबंधक कार्यालय, पोलिस आयुक्तालयावर मोर्चा, थाळी, शिट्टी वाजवून निर्माण केलेला दबाव यामुळे आदर्श घोटाळ्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. भ्रष्ट संचालक मंडळाची संपत्ती जप्त करून त्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यानचा प्रवास सोपा नव्हता. आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या. अश्रुधुरांचे नळकांडे, हवेत गोळीबार अशा संकटांना तोंड देत इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्शची संघर्ष समिती लढा देत होती. इम्तियाज जलील यांना सहानुभूती मिळत आहे, हे दिसताच मग इतर राजकीय पक्षांनी या विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली.

पण आदर्शच्या ठेवीदारांनी शेवटपर्यंत विश्वास कायम ठेवला तो इम्तियाज जलील यांच्यावर. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आदर्शचे ठेवीदार इम्तियाज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, पण त्यांची शक्ती कमी पडली. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील पराभूत झाले आणि महायुतीचे संदीपान भुमरे निवडून आले. आदर्शच्या ठेवीदारांसाठी इम्तियाज यांचा पराभव धक्का देणारा होता.

निवडणूक निकालानंतर आज आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिल्ह्यातील कन्नड, पिशोर, वैजापूर, गंगापूर, नाचनवेल, सारोळा, लिंबाजी चिंचोली, आळंद, सिल्लोड, फरदापुर, करमाड, बिडकीन, वाळूज, पंढरपूर, बजाज नगर, गल्लेबोरगाव, हातनूर, शहर पळशी, संभाजीनगर मध्य, पूर्व, पश्चिम अशा एकूण 42 शाखेतील ठेवीदार आज इम्तियाज जलील यांच्या मन्नत या निवासस्थानी धडकले.

निवडणुकीतील पराभवाने खचू नका, साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा शब्दात हे ठेवीदार इम्तियाज यांचे सांत्वन करत होते. ठेवीदारांचे हे प्रेम पाहून भारावलेल्या इम्तियाज जलील यांनी मी खासदार असो किंवा नसो, तुमच्या कष्टाचे पैसे जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत लढा देऊ, असा विश्वास उपस्थितांना दिला.यावेळी अनेक ठेवीदारांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत इम्तियाज जलील यांच्या पराभवाबद्दल दुःखही व्यक्त केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com