MP Imtiaz Jaleel Oath News: इम्तियाज यांनी शपथ घेतली, तो `आदर्श` घोटाळा नेमका कसा झाला ?

Aurangabad News : पोटनियमात तरतूद नसतानाही विविध संस्थांच्या नावे आपसातच विनातारण कर्ज देऊन २०० कोटी रुपयांचा घोटाळा.
MP Imtiaz Jaleel Oath News
MP Imtiaz Jaleel Oath NewsSarkarnama

Aurangabad Scam News : पोलिस आयुक्तालयावर मोर्चा, धरणे आंदोलन आणि आज थाळीनाद करत खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्श पतसंस्थेत घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध आज पुन्हा आंदोलन छेडले. कोणत्याही परिस्थितीत गोरगरिब, सर्वसामान्य ठेवीदारांचा कष्टाचा पैसे, आयुष्यभराची पुंजी घोटाळेबाजांच्या घशात जावू देणार नाही, ती परत मिळवून देणारच, अशी शपथच इम्तियाज जलील यांनी घेतली आहे.

MP Imtiaz Jaleel Oath News
MP Imtiaz Jalil News : ठेवीदारांच्या पैशासाठी इम्तियाज यांचा `थाळीनाद`..

दोन महिन्यांपुर्वी उघडकीस आलेला हा आदर्श नागरी पतसंस्था घोटाळा नेमका आहे तरी काय? तो कसा झाला यावर नजर टाकली की याची व्याप्ती लक्षात येते. (Scams) आदर्श पतसंस्थेचा सर्वेसर्वा आणि मुख्यसूत्रधार असलेल्या अंबादास मानकापे यांच्या नेतत्वाखालील संचालक मंडळ, सहकार खात्यातील अधिकारी यांना हाताशी धरून दोनशे कोटीहून अधिकचा हा घोटाळा करण्यात आला.

मानकापे याचे वर्चस्व असलेल्या आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या १५ पेक्षा जास्त संस्थांना नियमबााह्य कर्ज वाटप केल्याचे लेखापरीक्षक अहवालातून समोर आले. (Imtiaz Jalil) कर्ज वाटप केले त्या मानकापे याचे नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तीच्या नावे ही कर्ज उचलण्यात आली आहेत. (Marathwada) विशेष म्हणजे जामीनदार आणि विनातारण किंवा बनावट तारण, सभासद दाखवून हा कोट्यावधींचा घोटाळा करण्यात आला.

२०१६ ते २०१९ या तीन वर्षात तब्बल १०३ कोटी १६ लाख ७३ हजार ३८१ रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यानंतरच्या काळातही ९९ कोटी ७ लाख ९० हजार ५७९ रुपयांचा घोटाळा या बोगस कर्ज वाटपाच्या माध्यमातून झाल्याचे निष्पन्न झाले. १५ जुलै २०२३ रोजी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करत पोटनियमात तरतूद नसतानाही विविध संस्थांच्या नावे आपसातच विनातारण कर्ज देऊन २०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सहकारी संस्था वर्ग-२ चे लेखापरीक्षक धनंजय चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचे २०१६ ते २०१९ मध्ये लेखापरीक्षण केले. आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे तसेच संचालक मंडळासह ५० जणांनी विनातारण कॅश क्रेडिट कर्ज वाटप केल्याचे उघडकीस आले.

MP Imtiaz Jaleel Oath News
Wadettiwar on Ajit Pawar : उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा !

या कर्जाची रक्कम २०० कोटी रुपये असून याप्रकरणी अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे, महेंद्र जगदीश देशमुख, अशोक नारायण काकडे, मुख्य व्यवस्थापक देविदास सखाराम अधाने यांच्यासह ५० जणांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जदारांना कर्ज वितरित करताना अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक व शाखाधिकारी यांनी व्यवसायाच्या ठिकाणांची पाहणी व पडताळणी केली नाही. त्याचबरोबर तारण न स्वीकारता कर्ज दिले. या प्रकरणात १०८ कर्जदारांचा सहभाग होता की नाही, याच्या तपासासाठी लेखापरीक्षकाने संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे.

संचालक मंडळाने विनातारण कॅश क्रेडिट कर्ज वितरण केले. संस्थेच्या निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने आपसातच विविध संस्थांच्या नावे कर्ज घेतले आहे. ठेवीदारांचा विश्‍वासघात करून २०१९ च्या अखेरीस कागदपत्रे परिपूर्ण नसताना अर्ज स्वीकारून कर्ज वाटप केले. त्या वेळी कर्जवाटपाच्या निकषांचे उल्लंघन केले आहे, असे देखील लेखापरीक्षण अहवालातून समोर आले आहे. या संपुर्ण घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. सहकार विभागाने प्रशासक नेमला असून अध्यक्ष व संचालक मंडळातील ज्यांच्या नावावर संपत्ती आहे, ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com