Video Vishalgad Fort : मोठी बातमी! विशाळगडावर जाण्यापासून शाहू महाराजांसह नेत्यांना पोलिसांनी रोखलं

Violent at Vishalgad Fort : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान रविवारी जाळपोळ, तोडफोड आणि घरांवर हल्ला करण्यात आला होता. यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती आणि अन्य नेते विशाळगडाच्या पाहणीसाठी जात होते.
shahu maharaj.jpg
shahu maharaj.jpgsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलं. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचं आवाहन केलं होतं.

त्यानंतर जमावानं विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ केली. यात अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यावरून खासदार शाहू महाराज छत्रपती रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं होतं. यातच खासदार शाहू महाराज हे विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले होते. पण, विशाळगडाकडे जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे.

रविवारी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले होते. त्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. काही वेळानं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती गडाखाली आल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे जमावानं गोंधळ घालण्यास सुरूवात केली. हिंसक जमावानं जाळपोळ, तोडफोडीसह घरांवर हल्ले केले. या सगळ्या प्रकरणावरून खासदार शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांनी नाराजी व्यक्त केली होती.

shahu maharaj.jpg
Satej Patil : विशाळगड प्रकरणात सतेज पाटील आक्रमक, थेट 'एसपी'ची बदली करण्याची केली मागणी

“विशाळगड येथे झालेला हिंसाचार मनाला वेदना देणार आहे. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल, तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. विशाळगडावर सरसकट अतिक्रमणे काढण्याची कारवाई प्रशासनानं तातडीनं करावी. आम्ही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करणार आहोत,” असं सोमवारी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं होतं.

shahu maharaj.jpg
Sambhajiraje Protest : संभाजीराजेंचा लढा यशस्वी! दिवसभरात 50 अतिक्रमणं जमीनदोस्त

यानंतर आज खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी मंत्री सतेज पाटील ( Satej Patil ), माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर आणि अन्य नेते हे विशाळगडाकडे घटनास्थळी जाण्यास निघाले होते. पण, जमावबंदीच्या कारणास्तव पोलिसांनी खासदार शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील आणि अन्य नेत्यांना जाण्यापासून रोखलं. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं निर्माण झालं आहे. यावेळी पोलिस आणि पत्रकारांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com