Nana Patole Vs BJP : नाना पटोले यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "महायुती सरकारवर 'BJP-RSS'चा कंट्रोल, शिंदे फक्त..."

BJP-RSS serious allegations of Nana Patole : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना राज्य सरकारच्या कारभारावर तोंडसुख घेतले आहे.
Nana Patole Vs BJP
Nana Patole Vs BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरमध्ये आगपाखड केली. राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकावर भाजप आणि आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे फक्त मुखवटा घालून मिरवत आहे, असा घाणाघात नाना पटोले यांनी केला.

काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरवात लातूर येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना राज्य सरकारच्या कारभारावर तोंडसुख घेतले आहे.

Nana Patole Vs BJP
Congress Leader Nana Patole : संभाजीनगरची जागा काँग्रेसला दिली असती तर महायुतीची कीड मराठवाड्यातून हटवली असती..

मराठा आरक्षणावरून नाना पटोले यांनी महायुती सरकावर तोंडसुख घेतले. 'महायुती सरकारवर भाजप आणि आरएसएसचा कंट्रोल असल्याच म्हणत, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहे. मराठा आरक्षण देतो, असे सांगून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुलाल उधळला, पण हा गुलालच उधळला. जाहीर काही केलेच नाही', असा टोला नाना पटोले यांनी लगावला. मराठा आरक्षणासाठी लढा देणार मनोज जरांगे आणि सरकारमध्ये काय बोलणे झाले याची आम्हाला कल्पना नाही. माहिती दिली जात नाही. सरकार पाप करत सुटलं आहे आणि खापर विरोधकांवर फोडत आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा अजेंडा लोकांच्या देखील लक्षात आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

Nana Patole Vs BJP
Utkarsha Rupwate News : 'वंचित'च्या उत्कर्षा रूपवतेंचा महाविकास आघाडीसह राज अन् उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाल्या...

नाना पटोले यांनी देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मग आरक्षण देण्यापासून यांना कोणी थांबवले. फक्त समाजात, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे. फोड आणि राज्य करा अशी ब्रिटीश निती भाजपकडून सुरू आहे. मनुवादी व्यवस्था हवी की, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हवा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जनतेने पक्का विचार केला आहे. तो फक्त कृतीत आणण्याची वाट पाहात असून, यावेळी भाजप सरकारला बाय-बाय होणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

काँग्रेस राज्यात मोठा भाऊ होणार

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीने एक जागा जिंकली. पण विधानसभा निवडणुकीला मात्र मराठवाड्यातून महायुतीचा सुपडासाफ करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 185 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि राज्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या जातील, अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com